कापूस पिकाचे क्लेम पास केले जाणार....
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानी नंतर शेतकऱ्यांकडून कापसाच्या पिकाचा क्लेम करण्यात आला होता.
X
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानी नंतर शेतकऱ्यांकडून कापसाच्या पिकाचा क्लेम करण्यात आला होता.
नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामध्ये कापूस पिकाच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांकडून क्लेम करण्यात आला होते मात्र शेतकऱ्यांना या नुकसानीचा 25% पीक विमा मिळाला नव्हता. कापूस पिक विमा बाबतीत काही अटी व नियम शेतकऱ्यांना अवगत नसल्याकारणाने विमा कंपन्यांकडून त्यांचा क्लेम रिजेक्ट करण्यात आला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला न्हवता, पोस्ट हार्वेस्टेड ( Post-harvest Operations ) आणि स्टॅंडिंग क्रॉप ( Standing crop) च्या चुकीमुळे हे क्लेम बात करण्यात आले होते.

मात्र कृषी अधिकारी ,जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, कृषी मंत्रालय यांच्याकडे तक्रारी दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर आज कृषी विभागाने प्रत्येक पिक विमा कंपनींना शेतकऱ्यांचे क्लेम पास करण्याचे व त्यांना पीक विमा देण्याचे निर्देश देण्यात दिले आहेत.
ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता त्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.