Home > मॅक्स किसान > वातावरणीय बदलामुळे कोकणातील मच्छीमार हवालदील

वातावरणीय बदलामुळे कोकणातील मच्छीमार हवालदील

मुद्रातील बदलत्या परिसंस्थेमुळे या माशांवर तसेच त्यांच्या प्रजननावर प्रभाव पडत आहे.एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करता मासेमारी हा उत्पन्नाचा महत्त्वपूर्ण भाग असलेला मच्छीमार मेटाकूटीस आल्याचे सध्या कोकणात दिसून येत आहे.

वातावरणीय बदलामुळे कोकणातील मच्छीमार हवालदील
X

कोकण विभागाला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे.या समुद्रकिनाऱ्यावर वावरणारा मच्छीमार सध्या बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे मेटाकूटीस आल्याचे दिसून येत आहे.सततच्या बदलणाऱ्या वातावरणामुळे पुरेसे मासे मिळत नसल्याकारणाने तसेच कामगारांचा भत्ता,डिझेल खर्च अशा अनेक बाबींमुळे तो पूर्णपणे ग्रासल्याचे दिसून येत आहे.तसेच योग्य त्या प्रमाणात मासे मिळत नसल्याकारणाने आर्थिक गणित जुळवताना त्याची तारांबळ उडत आहे.विस्तीर्ण अशा लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याला विविध प्रकारचे उत्पन्न देणारे मासे कोकणातल्या सागरी किनारपट्टी आढळतात.बांगडा,सुरमई,पापलेट,कोलंबी आधी भरघोस उत्पन्न देणाऱ्या माशांची कमतरता जाणवल्यामुळे तसेच समुद्रातील बदलत्या परिसंस्थेमुळे या माशांवर तसेच त्यांच्या प्रजननावर प्रभाव पडत आहे.एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करता मासेमारी हा उत्पन्नाचा महत्त्वपूर्ण भाग असलेला मच्छीमार मेटाकूटीस आल्याचे सध्या कोकणात दिसून येत आहे.





Updated : 25 Sept 2023 6:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top