बीटी कॉटन कशासाठी? शरद पवारांना शेतकरी नेत्यांचा थेट सवाल...
X
भारतात मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घेतलं जातं. भारतात साधारणपणे शेतकरी कापसाच्या बीटी कॉटन च्या बियाणांचा वापर करतो. पुर्वी एकरी एक बॅग शेतकरी लागवडीसाठी वापरायचा. आता कंपन्या एकरी दोन तीन बॅगा लावण्यास सांगतात. त्यातच जर आपण जागतिक स्तरावर कापसाच्या बियाणांचा विचार केला तर अमेरिकेतील कापसाचा धागा भारतातील धाग्या पेक्षा जास्त मोठा आहे.
हे ही वाचा...
महापूरानंतर कोरोना, सलग 2 वर्ष संकटं, मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ
लॉकडाऊनविरोधातील सत्याग्रहाची सुरूवात पंढरपुरातून : प्रकाश आंबेडकर
विशेष बाब म्हणजे अमेरिकेत बीटी कॉटनचं बियाणं वापरलं जात नाही. तरी अमेरिकेतील कापसाचं उत्पादनाचा दर्जा आणि उत्पन्न देखील भारताच्या तुलनेत अधिक आहे. असं असताना भारतात बीटी कॉटनटचा आग्रह का? या संदर्भात शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी थेट शरद पवार यांना सवाल केला, असता शरद पवार यांनी काय उत्तर दिलं. भारतात सरळ कापसाचे बियाणे का मिळत नाही? पाहा शेतकरी नेते विजय जावंधिया यांचं विश्लेषण