Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांसाठी काळा दिवस: संजय राऊत

शेतकऱ्यांसाठी काळा दिवस: संजय राऊत

गेली सत्तावीस दिवस राजधानी दिल्लीच्या सिंघु सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी‌ आंदोलनाचा संदर्भ देत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत हा शेतकऱ्यांसाठी काळा दिन असल्याचं म्हटलं आहे.

शेतकऱ्यांसाठी काळा दिवस: संजय राऊत
X

देशातला शेतकरी गेल्या एक महिन्यापासून देशात नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. मंगळवारी महाराष्ट्रासह मुंबईतही शेतकऱ्यांची आंदोलन झाले. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी तीन काळ्या विधेयकाच्या विरोधात एक महिन्यापासून दिल्लीच्या थंडीत आंदोलन करत आहे. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही आणि कुटुंबाचीही चिंता नाही. आतापर्यंत १२ शेतकऱ्यांचा आंदोलनाचा ठिकाणी मृत्यू झाला. तर एका संताने आत्महत्या केली आहे.

आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस असल्याची टीका शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत पत्रकारांशी बोलताना केली.

आपण देशात जय जवान जय किसान म्हणतो. देशात मात्र जवानाच्या हौतात्म्याच्या बातम्या येत आहेत तर शेतकरी आत्महत्या करतोय ही स्थिती आहे. जरी या देशाचा कणा शेतकरी असेल तरीही सरकार मात्र काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा कणा मोडून टाकण्याचे पाप केंद्र सरकार करत आहे. म्हणूनच सरकारला विनंती आहे की अहंकार बाजूला ठेवा. शेतकरी हे आपले अन्नदाते आहेत त्यांच्याशी चर्चा करा असे संजय राऊत म्हणाले.


Updated : 23 Dec 2020 12:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top