Home > मॅक्स किसान > #Singhu : सिंघू बॉर्डरवर तरुणाचा मृतदेह, भाजप शेतकरी आंदोलनाविरोधात सक्रीय-राष्ट्रवादी

#Singhu : सिंघू बॉर्डरवर तरुणाचा मृतदेह, भाजप शेतकरी आंदोलनाविरोधात सक्रीय-राष्ट्रवादी

#Singhu : सिंघू बॉर्डरवर तरुणाचा मृतदेह, भाजप शेतकरी आंदोलनाविरोधात सक्रीय-राष्ट्रवादी
X

कृषी कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या स्टेजजवळ एका तरुणाची हत्या करुन मृतदेह टांगलेल्या अवस्थेत आढळला आहे. यानंतर खळबळ उडाली असताना आता या मुद्द्यावरुन राजकारण तापले आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आता या मुद्द्यावरुन आंदोलक शेतकऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. " बलात्कार, हत्या, वैश्यावृत्ति, हिंसा और अराजकता... किसान आंदोलन के नाम पर यह सब हुआ है। अब हरियाणा के कुंडली बॉर्डर पर युवक की बर्बर हत्या... आखिर हो क्या रहा है? किसान आंदोलन के नाम पर यह अराजकता करने वाले ये लोग कौन हैं जो किसानों को बदनाम कर रहे हैं?"

असे ट्विट करत टीका केली आहे.


अमित मालवीय यांच्या ट्विटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे. शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. अमित मालवीय यांनी ज्याप्रकारे टीका केली ते पाहता आता भाजपचे आयटी सेल शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सक्रीय झाले आहे, त्यामुळे यामागे कट आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. आंदोलक शेतकऱ्यांना कधी खालिस्तानी, कधी नक्षलवादी म्हणायचे, आता तर खुनाचा आरोप केला जातो आहे, त्यामुले हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची टीका मलिक यांनी केली आहे.

Updated : 15 Oct 2021 5:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top