Home > मॅक्स किसान > दुधाचा दराचा आज मोठा निर्णय होणार : दुग्ध विकास मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठव...

दुधाचा दराचा आज मोठा निर्णय होणार : दुग्ध विकास मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठव...

दुधाचा दराचा आज मोठा निर्णय होणार : दुग्ध विकास मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठव...
X

राज्यात दुधाचा प्रश्न पेटला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना सद्याचा दुधाचा दर परवडत नाही. यामुळे राज्यात अनेक भागात शेतकरी आंदोलन करीत आहे. दुधाचे भावाबाबत सरकारच धोरण दूध उत्पादक शेतकऱ्यांविरोधात असल्याची टीका शेतकरी करत आहे.

दुधाला अनुदान देण्याची घोषणा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती मात्र एक रुपया ही अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही आता पुन्हा दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

आज निघणार तोडगा :

राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढी संदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतकरी यांची महत्वाची बैठक आज विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढला जाणार आहे.

या बैठकीला राज्यातील खाजगी तथा सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्तांनी सांगितले.

या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल व या बैठकीचा अहवाल मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल. तसेच लवकरच दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाण्याची श्यक्यता आहे.

Updated : 28 Jun 2024 1:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top