कांदा -कापूस प्रश्नी सरकारची बघ्याची भुमिका ; भारत राष्ट्र समितीचे घंटानाद आंदोलन
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCERB)या केंद्र सरकारच्या एजन्सी रिपोर्टनुसार, गेल्या ११ वर्षात महाराष्ट्रात ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सद्यपरिस्थितीत शेतकरी मेटाकुटीला आला असून अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत आहे. यात कांदा उत्पादक शेतकऱ्यास हमीभाव न मिळाल्याने तो पुरता भरडला गेला आहे. सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असताना दिसून येत आहे...
X
कांदा (onion) उत्पादक शेतकऱ्यास दिलासा मिळावा याकरीता शासनाने नाफेड (Nafed)आणि पणन (marketing) मार्फत खरेदी केंद्र सुरू करावे या प्रमुख मागणीसाठी भारत राष्ट्र समिती (BRS) धुळे जिल्हा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा समन्वयक ईश्वर पाटील यांच्या नेतृत्वा खाली जिल्हा प्रशासनाला निवेदन देत घंटानाद आंदोलन केले आहे.यावेळी भारत राष्ट्र समितीचे धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी सांगितले की, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCERB)या केंद्र सरकारच्या एजन्सी रिपोर्टनुसार, गेल्या ११ वर्षात महाराष्ट्रात ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सद्यपरिस्थितीत शेतकरी मेटाकुटीला आला असून अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत आहे. यात कांदा उत्पादक शेतकऱ्यास हमीभाव न मिळाल्याने तो पुरता भरडला गेला आहे. सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असताना दिसून येत आहे. त्यामुळे खरीप हंगाम सुरू होण्यापुर्वी कांदा उत्पादक व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी शासन स्तरावर सुरू असलेली योजना नाफेड आणि पणन मार्फत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जागे करण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात ईश्वर पाटील यांच्यासह अॅड. अशोक पाटील, अविनाश पवार, लोटन पाटील, प्रमोद पाटील, प्रितीसागर पगारे, शाहरूख पटवे, दत्तात्रय पाटील, अशोक करंजे, अनिल पवार, राकेश पाटील, विश्वास खलाणे, विठ्ठल पाटील यांनी सहभाग नोंदविला आहे.