Home > मॅक्स किसान > बँका आणि महसूल विभागाचा गोंधळ, दिवाळीत शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता कमीच

बँका आणि महसूल विभागाचा गोंधळ, दिवाळीत शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता कमीच

बँका आणि महसूल विभागाचा गोंधळ, दिवाळीत शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता कमीच
X

शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून अतिवृष्टी नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होते. मात्र अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील बँक आणि महसूल विभागाच्या गोंधळात शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्याची अपेक्षा कमीच आहे. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांची दिवाळी कडूच होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.





मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाला आहे. त्यामुळे सरकारकडून नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली होती. तसेच ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पडेल अशी अपेक्षाही होती. पण प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे दिवाळीपूर्वी मदत मिळणे शक्य दिसत नाही.





औरंगाबाद येथील बिडकीन भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत म्हणून औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत महसूल विभागाने आज 1 कोटी 24 लाख 27 हजार 800 रुपयांचा चेक दिला. मात्र सर्कल मध्ये आमची दुसरी शाखा असूनही तिचा लोड आमच्याकडे का असा प्रश्न बँक मॅनेजर यांनी उपस्थित केला. त्यामुळे आमच्या हद्दीत गावे नसल्याच म्हणत लेखी देऊन यादी परत पाठवली आहे. त्यामुळे या गोंधळात शेतकऱ्यांना आणखी किती दिवस मदतीपासून वंचीत राहावे लागेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Updated : 3 Nov 2021 4:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top