Home > मॅक्स किसान > कलिंगडाच्या उत्पादनातून शेतकऱ्याने कमावले ५० दिवसात ५० लाख रुपये

कलिंगडाच्या उत्पादनातून शेतकऱ्याने कमावले ५० दिवसात ५० लाख रुपये

कलिंगडाच्या उत्पादनातून शेतकऱ्याने कमावले ५० दिवसात ५० लाख रुपये

कलिंगडाच्या उत्पादनातून शेतकऱ्याने कमावले ५० दिवसात ५० लाख रुपये
X

पारंपरिक आणि आधुनिक शेतीचा मेळ घालत तांदुळवाडी ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील शेतकऱ्याने कलिंगडाच्या उत्पादनातुन अवघ्या ५० दिवसात ५० लाख रुपये कमावण्याची किमया साधली आहे. तांदुळवाडी येथील सुनील विष्णू चव्हाण व अनिल विष्णू चव्हाण अशी कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या या शेती प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत असून कलिंगडाची शेती पाहण्यासाठी अनेकजण भेटी देत आहेत.

सुनील चव्हाण व अनिल चव्हाण या दोघा भावंडाना तांदुळवाडी येथे वडिलोपार्जित १५ एकर शेत जमीन असून या वर्षी त्यांनी शेतीत नवीन प्रयोग करण्याचे ठरवून ६ एकरात मेलोडी कलिंगडाच्या रोपांची लागवड केली.

कशी केली लागवड?

लागवडीपूर्वी त्यांनी शेताची चांगल्या प्रकारे मशागत करून घेतली.

शेतात मल्चिंग पेपर कलिंगड रोपांची लागवड केली.

६ एकरात ३५ हजार रोपांची लागवड केली.

ठिबक सिंचनाने त्याला पाण्याची सोय करण्यात आली.

या कलिंगड रोपांची लागवड ११ जून २०२१ रोजी करण्यात आली होती.

या मेलोडी कलिंगडाच्या लागवडीपासून ते कलिंगड मार्केटमध्ये विक्रीसाठी जाईपर्यंत ४ लाख २० हजार रुपये खर्च आला असल्याचे शेतकरी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

कलिंगडाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर करण्यात आला असून रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ६ दिवसाला कीटकनाशकांची फवारणी केली जात होती. तसेच ३ दिवसाला ठिबक मधून रासायनिक द्रव्ये सोडली जात असे. त्यामुळे पीक अधिक जोमाने वाढले.

पिकाची योग्य निगा राखल्याने कलिंगडाचे चांगले वजन भरल्याने अवघ्या ५० दिवसात विकण्यायोग्य बनले. ६ एकरात १५० टन कलिंगडाचे उत्पादन निघाले असून हे कलिंगड ३४ रुपये किलो दराने मुंबई येथील व्यापाऱ्याला विकले गेले. कलिंगडाच्या १५० टन उत्पादनातून ५० लाख रुपये मिळाले आहेत. चव्हाण यांच्या या कलिंगडाच्या शेतीची आजूबाजूच्या परिसरात जोरदार चर्चा सुरू असून त्यांचे कौतुक होत आहे.

सुनिल विष्णू चव्हाण व अनिल विष्णू चव्हाण या दोन्हीं भावांनी कलिंगड लागवडीच्या उत्पन्नातून आर्थिक स्त्रोत निर्माण करुन कुटुंबाच्या उत्पन्नात भलतीच भर घातली आहे. यामुळे त्यांना चांगला आधार मिळाला आहे. त्यांच्याकडे विहीर, बोअरवेल असून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. अशा लोकांनी कलिंगडाची लागवड केल्यास भरपूर नफा मिळतो.





पारंपरिक पिकाला फाटा...

ते गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक पद्धतीची पीके घेत होते. त्यांच्या १५ एकर शेती पैकी ६ एकरात कलिंगडाची लागवड केली असून राहिलेल्या ८ एकरात ऊस, मका, भुईमुग व इतर पिकांचा समावेश आहे. शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी जनावरे देखील पाळली आहेत. त्यांना जनावरांच्या दूध विक्रीतून ही आर्थिक फायदा होत आहे.

या वर्षी त्यांनी शेतीत नवीन प्रयोग करण्याचे ठरवून शिवनेरी रोपवाटीकीचे बळीराम जाधव व ज्योतीराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मेलोडी कलिंगड पिकांची शास्त्रशुध्द पध्दतीने लागवड करण्याचे ठरवून कलिंगडाच्या रोपांची लागवड केली. एकुण ६ एकरामध्ये कलिंगडाच्या रोपांची लागवड करून त्याची व्यवस्थित देखभाल केली असून पाण्याचे योग्य नियोजन करीत काळ्यापाटीचे जोमदार कलिंगडाचे पिक घेतले आहे.

कलिंगड अवघ्या ५० दिवसात मोठे होऊन प्रति नग ७ ते ८ किलो वजनाचे झाले व त्या कलिंगडाला ३४ रुपये असा प्रति किलो विश्वविक्रमी दर मिळाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला भरघोस असा आर्थिक आधार मिळाला असून अवघ्या ५० दिवसात चव्हाण बंधू तब्बल ५० लाखांचे मालक झाले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेतकरी सुनील चव्हाण यांनी बातचीत करताना सांगितले की, शेतात मेलोडी कलिंगड जातीच्या रोपांची लागवड केली असून ही लागवड ६ बाय १ या अंतरावर आहे. ६ एकरात लागवडीसाठी ३५ हजार रोपे लागली असून त्याला ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन करण्यात आले. कलिंगडाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. ६ एकरात कलिंगडाचे १५० टन उत्पादन निघाले असून कलिंगडाची विक्री मुंबई येथील व्यापाऱ्याला ३४ रुपये दराने करण्यात आली. दररोज दोन टेम्पो कलिंगडाचा माल निघत असून बाहेरच्या देशात पाठवले जात आहे.

या कलिंगडाची लागवड ११ जूनला करण्यात आली होती. शेतातील कलिंगडाची पूर्ण तोडणी झाली आहे. या पिकावर ६ दिवसाला फवारणी करण्यात येत होती. तसेच ठिबक मधून ३ दिवसाला रासायनिक खते सोडत होतो. ६ एकरात १५० टन उत्पादन निघाले असून ५० दिवसात मला ५० लाख रुपये मिळाले आहेत.या कलिंगडाच्या लागवडीपासून मार्केटला जाईपर्यंत ४ लाख २० हजार रुपये खर्च झाला आहे. ४ लाख रुपये खर्च सोडला तर जवळ-जवळ ४७ लाख रुपयांचा नफा झाला आहे.या कलिंगडाच्या लागवड, फवारणी व इतर गोष्टींसाठी मला शिवनेरी रोपवाटीकेचे बळीराम जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.





Updated : 7 Aug 2021 8:35 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top