कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी?
:राज्यातील कृषी (agriculture)क्षेत्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून (technology) आधुनिकतेने करता यावी यासाठी राज्य सरकारकडून कृषी यांत्रिकीकरण (agri mechanization)योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मागील तीन वर्षांत सव्वा आठसे कोटींहून अधिक लाभार्थ्यांना अनुदान वितरित झाला आहे. तर १ लाख ३७ हजारांहून अधीक जणांना याचा फायदा झाले असून सदर योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरली आहे.
X
राज्यात (maharashtra)कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याचे दिसताच राज्य सरकारने यांत्रिकीकरणाचा पर्याय पुढे केला आहे. याअंतर्गत कृषी विकासाला गती देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून बळ देण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांत १ लाख ३७ हजार सातसे ९९ लाभार्थ्यांना आठसे २४ कोटींहून अधिक रकमेचे अनुदान या योजनेतून मिळवा असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीपूरक यंत्र सामग्री खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे व त्याद्वारे कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुरुप आणि मागणीप्रमाणे लागणारी यंत्रसामग्री आणि अवजारे या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलित अवजारे, मनुष्य, बैल चलित अवजारे, स्वयंचलित यंत्रे, काढणीपश्चात संयंत्रे आदींचा समावेश आहे. छोट्या शेतकऱ्यांना वाजवी दरात या यंत्रसामग्रीचा लाभ घेता यावा यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ दिले जात आहे. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला लाभार्थींसाठी किमतींच्या ५० टक्के किंवा सव्वा लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरुपात देण्यात येते. तर इतर लाभार्थ्यांसाठी किमतींच्या ४० टक्के किंवा रुपये १ लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. मात्र, पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलित औजारे, मनुष्य/बैल, चलित औजारे, स्वयंचलित यंत्रे, काढणी पश्चात संयंत्रे आदी इतर औजारांसाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या अनुदान मर्यादेनुसार कृषी यांत्रिकीकरण अभियानात अनुदान दिले जाते.
गत तीन वर्षांत ट्रॅक्टरसाठी २१ हजार ३७५ लाभार्थ्यांना २६०.२६ कोटी रुपये अनुदान, पॉवर टिलरसाठी ५ हजार ९०७ लाभार्थ्यांना ४४.९२ लाख रुपये, ट्रॅक्टर चलित औजारांसाठी १ लाख १ हजार ५३२ लाभार्थींना ४६१ कोटी ९ लाख रुपये, मनुष्य /बैल चलित औजारांसाठी ४ हजार १५६ लाभार्थींना २ कोटी ३९ लाख रुपये, स्वयंचलित यंत्रांसाठी २ हजार ३१७ लाभार्थ्यांना १५ कोटी ७७२ लाख रुपये आणि काढणी पश्चात संयंत्रांसाठी १ हजार ९३६ लाभार्थ्यांना १५ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. याशिवाय, छोट्या शेतकऱ्यांना वाजवी दरात या यंत्रसामग्रीचा लाभ घेता यावा, यासाठी कृषी औजारे बॅंक (सेवा सुविधा केंद्र) सुरु करण्यात आले आहे. त्याचा लाभ ५७६ शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी २४ कोटी ९ लाख रुपये अनुदान देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.