Home > मॅक्स किसान > कृषी दिन विशेष:शहरी बांधवांनो, जरा आमच्याकडे पहा..

कृषी दिन विशेष:शहरी बांधवांनो, जरा आमच्याकडे पहा..

महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती.. राज्य सरकार कृषी दिन साजरा करत असलं शहरी भागात भाजीपाला महाग झाला म्हणुन बोंबाबोंब होते, तिथं बांधावर राबणाऱ्या कास्तकऱ्याची अवस्था काय आहे, पहा आणि ऐका संगमनेर जि. अहमदनगरचे शेतकरी विकास भालकेंची व्यथा exclusively MaxKisan वर....

कृषी दिन विशेष:शहरी बांधवांनो, जरा आमच्याकडे पहा..
X

भाज्यांचे दर कडाडले; मात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही

महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती.. राज्य सरकार कृषी दिन साजरा करत असलं शहरी भागात भाजीपाला महाग झाला म्हणुन बोंबाबोंब होते, तिथं बांधावर राबणाऱ्या कास्तकऱ्याची अवस्था काय आहे, पहा आणि ऐका संगमनेर जि. अहमदनगरचे शेतकरी विकास भालकेंची व्यथा exclusively MaxKisan वर....

राज्यात भाजीपाल्याचे दर वाढल्याने शहरी भागातील नागरीकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मात्र भाजीपाला पिकवणाऱ्या बळीराजाला त्याचा फायदा होत नाही.

टोमँटो, प्लॉवर, कोथंबीर, कोबी व अन्य सर्वच भाज्यांचे सध्या दर चांगलेच वाढले आहेत. ज्या वेळी भाज्यांचे दर वाढतात त्यावेळी आरडाओरडा केला जातो. मात्र संगमनेरच्या शेतकऱ्याने त्यांना चांगलच उत्तर दिले आहे. भर पावसात हा शेतकरी प्लॉवरची काढणी करत आहे. मात्र प्लॉवर जरी 20 रूपये किलोने विक्री होत असेल तरी आम्हाला किलो मागे फक्त दीड रूपया मिळत असल्याची धक्कादायक बाब शेतकऱ्याने बोलुन दाखवलेली आहे. भरपावसात आम्ही काम करतो लेबर, उत्पादन खर्च, मेहनत, निर्सग या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर काय उरते? हे ही शहरातील आमच्या बांधवांनी भाजीपाला खरेदी करतान पहावे आणी मगच भाव वाढला अशी ओरड करावी असे या विकास भालके या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

Updated : 30 Jun 2023 6:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top