Home > मॅक्स किसान > भाजीपाल्याचे दर रोडावले

भाजीपाल्याचे दर रोडावले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक जास्त; मात्र ग्राहकांनी भाजीपाल्याकडे फिरवली पाठ

भाजीपाल्याचे दर रोडावले
X

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ असते, मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 500 पेक्षा जास्त गाड्यांची आवक झाली आहे. काल दसरा असल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी भाजीपाल्याकडे पाठ फिरवल्या दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडून तसाच आहे. साधारणपणे भाज्यांचे दर ३५ टक्क्याने कमी झाले आहेत. त्यामुळे वांगी, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो यांचे दर साधारणपणे दहा ते बारा किलो प्रमाणे व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाल्याचे दिसून येत आहेत.

Updated : 25 Oct 2023 7:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top