Home > मॅक्स किसान > महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनाचे ३२१ दिवस

महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनाचे ३२१ दिवस

महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनाचे ३२१ दिवस
X

नवी दिल्ली : (New Delhi) येथे केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या अकरा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात वर्धा येथील बजाज चौकात शेतकरी कामगारांनी धरणे आंदोलन केले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला ३० ऑक्टोबर ला शनिवारी ३२१ दिवस पुर्ण झाले आहेत.

यानिमित्ताने वर्धा शहरातील बजाज चौकात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ३० आँक्टोबरला राज्य किसान सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी भेट दिली. दिल्लीत सूरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे रद्द करा या मागणीसाठी शेतकरी अखंडितपणे आंदोलने करत आहेत. याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. यासोबतच दिल्लीत आंदोलनादरम्यान ६०० च्या वर शेतकरी बांधव शहीद झाले असुनही अखंडितपणे आंदोलन सुरू आसल्याचे सांगून उपस्थित शेतकरी बांधवांमध्ये उत्साह भरण्याचे काम केले.

Updated : 30 Oct 2021 4:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top