Home > मॅक्स किसान > शंभर वर्षांपूर्वी लावलेले झाड आज पण देते लाखोंचे उत्पन्न..

शंभर वर्षांपूर्वी लावलेले झाड आज पण देते लाखोंचे उत्पन्न..

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे चव्हाण परिवाराने शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वी फणसाचे रोप आणून आपल्या शेतातील बांधावर लावले होते. त्या झाडाला तीन वर्षानंतर फळ लागण्यास सुरुवात झाली. आता या झाडाला शंभर ते सव्वाशे वर्ष पूर्ण होत आहेत तरीदेखील या झाडाला आज लागत 200 ते 300 फळे येत असून या फणसाला बाजारामध्ये मोठी मागणी आहे. प्रत्येकी एक किलो दीडशे ते दोनशे रुपये भाव असून अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या झाडाचा रोप आणून आपल्या बांधावरती लावावे जेणेकरून जोडधंदा म्हणून शेतकऱ्याला याचा फायदा होईल, असे शेतकऱ्याने म्हटले आहे

शंभर वर्षांपूर्वी लावलेले झाड आज पण देते लाखोंचे उत्पन्न..
X

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे चव्हाण परिवाराने शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वी फणसाचे रोप आणून आपल्या शेतातील बांधावर लावले होते. त्या झाडाला तीन वर्षानंतर फळ लागण्यास सुरुवात झाली. आता या झाडाला शंभर ते सव्वाशे वर्ष पूर्ण होत आहेत तरीदेखील या झाडाला आज लागत 200 ते 300 फळे येत असून या फणसाला बाजारामध्ये मोठी मागणी आहे. प्रत्येकी एक किलो दीडशे ते दोनशे रुपये भाव असून अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या झाडाचा रोप आणून आपल्या बांधावरती लावावे जेणेकरून जोडधंदा म्हणून शेतकऱ्याला याचा फायदा होईल, असे शेतकऱ्याने म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये कोचित ठिकाणी या फणसाची झाडे आढळतात. या फळाची खासियत अशी आहे की, हे फळ कच्चे असताना भाजीसाठी देखील वापरले जाते व पिकल्यानंतर गोड फळ म्हणून सुद्धा खाल्ले जाते. नांदेडच्या बाजारामध्ये देखील या फळाला खूप मोठी मागणी आहे. हेच फणस बाजारामध्ये विकली तर दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळते. पण चव्हाण परिवार हे फळ विकत नसून आजूबाजूतील परिसरातील शेतकरी हे फळ खाण्यासाठी घेऊन जातात व चव्हाण परिवाराला त्यामध्ये आनंद वाटतो. यामागे कारण की, आमच्या शेतामध्ये असलेले हे आजोबांनी लावलेले झाड आज पण जिवंत आहे व या झाडातून आजूबाजूतील शेतकऱ्यांना फळाच्या माध्यमातून आनंद मिळतो. त्यात आम्हाला समाधान आहे, असे शेतकरी गजानन चव्हाण यांनी सांगितले.


Updated : 18 April 2023 3:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top