एमपीएससी भूगोल विषयासाठी अभ्यास टिप्स
GSI मधील अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे भूगोल
1) प्राकृतिक भूगोल
2) महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल
3) महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल
4) पर्यावरण भूगोल
5) जनभूगोल शास्त्र (महाराष्ट्राच्या संदर्भात)
6) सुदूर संवेदन (REMOTE SENSING)
भूगोल हा काही जणांना क्लिष्ट वाटण्याची शक्यता आहे. पण एक-दोन रिविजननंतर एकदा तुम्हाला भूगोल समजायला लागला की, खूप सोप्पा आणि इंटरेस्टिंग बनतो. परंतू सुरुवातीला तुम्हाला भूगोलाशी गट्टी जमेपर्यंत संयमाने अभ्यास करत रहावे लागेल. भूगोलकरिता सर्वप्रथम NCERT ची पुस्तके नीट वाटणे अत्यंत गरजेचे आहे.
भूगोलाकरिता संदर्भ पुस्तके
1) मेगोस्टेट महाराष्ट्र - सवदी
2) कृषी व भूगोल - सवदी
3) महाराष्ट्राचा भूगोल - सवदी
4) महाराष्ट्राचा भूगोल - प्रो. खतीब
5) भारताचा भूगोल - प्रो. खतीब
6) भारत व भूगोल - माजिद हुसेन
7) भारत एवं विश्व भूगोल - माजिद हुसेन
8) भूगोल - डी. आर. खुल्लर
9) प्राकृतिक भूगोल - प्रो.खतीब
10) NCERT सर्व भूगोल पुस्तके
11) महाराष्ट्र शासन भूगोल क्रमिक पुस्तके 4 थी ते 12 वी
SPECTRUM चे भूगोलचे प्रश्नोत्तर मिळाली तर ते घेऊन सोडवायचे प्रयत्न करा. SPECTRUM किंवा UNIQUE चे UPSC चे G.S. चे मोठे पुस्तक अण्णा बळवंत चौक (ABC) किंवा मुंबई फोर्ट भागात सेंकडहँड मिळाले तर विकत घ्या. जुने असले तरी त्यातील इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यघटना यातील प्रश्नोत्तरे तुम्हाला फार उपयोगी ठरतील. भूगोलाच्या संदर्भात महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्तीत जास्त भर द्या. REMOTE SENSING साठी NCERT, सवदी या पुस्तकांवर भर द्या. मानवी व सामाजिक भूगोल माजिद हुसेन, सवदी यांच्या पुस्तकामधून नीट समजून घ्या. प्राकृतिक भूगोलसाठी NCERT 11,12 वी ,SPECTRUM आणि माजिद हुसेन
NCERT चे सर्व प्रश्नोत्तरे, जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा हो सर्व नीट सोडवा. त्याकरिता वेगळी वही करा. SPECTRUM /UNIQUE मधून तुमच्या सिलॅबसमधील सर्व टॉपिक्स व्यवस्थित अभ्यासून घ्या. मागील 3-4 वर्षात महाराष्ट्र, भारत, जग महत्त्वाची वादळे, चक्रीवादळे, आपत्ती, भूकंप, आपत्ती व्यवस्थापन हे सर्व नजरेखालून घाला. पर्यावरण व नद्या याकरिता लेटेस्ट ट्रेंड्स पाहा. महाराष्ट्रात नदीवर होणारी प्रोजेक्ट्स आणि प्रकल्प यांची यादी बनवा. महाराष्ट्र आणि नजीकच्या राज्यातील जोड प्रकल्प, पाणीप्रश्न याकडे विशेष लक्ष द्या.