Home > मॅक्स एज्युकेशन > हातनोरे जिल्हा परिषद शाळेत साजरा केला अनोखा स्वातंत्र्य दिन

हातनोरे जिल्हा परिषद शाळेत साजरा केला अनोखा स्वातंत्र्य दिन

हातनोरे जिल्हा परिषद शाळेत साजरा केला अनोखा स्वातंत्र्य दिन
X

दिंडोरी तालुक्यातील हातनोरेची जिल्हा परिषद शाळा स्मार्ट होत आहे. एक हात मदतीचा, ठेवा आठवणींचा या योजनेंतर्गत एक अभिनव उपक्रम आखण्यात आला होता. या जिल्हा परिषद शाळेतील स्वातंत्र्य दिन वेगळ्याच प्रकारे साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनी नाशिकमधील अनेकांनी या शाळेला महान व्यक्तींच्या प्रतिमा, कचरापेट्या, ध्वनिक्षेपण यंत्रणा भेट दिली व स्वातंत्र्य दिन साजरा केला. या स्वातंत्र्य दिनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब चारोस्कर व इतर मान्यवरही उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शाळेतील ध्वजारोहण करण्यात आले. 'एक हात मदतीचा, ठेवा आठवणींचा' या योजनेंतर्गत नीलेश लोमटे यांनी शाळेला १६ महान व्यक्तींच्या व समाजसुधारकांच्या प्रतिमा, नाशिक आयमा व अविनाश बोडके यांनी शालेय स्वच्छता व सुशोभीकरणासाठी दहा कचरापेटी व १० फुलझाडांच्या कुंड्या, चौघुले यांनी प्रशस्त साउण्ड सिस्टीम, शिक्षक व ग्रामस्थांकडून कपाटे आदी वस्तू शाळेला भेट दिल्या.

शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसंबंधी संदेश देत पथनाट्य सादर केले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी पवार व जलनायक योगेश बर्वे यांनी स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले. हातनोरे गावात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाला.

Updated : 19 Aug 2018 1:59 PM IST
Next Story
Share it
Top