Home > मॅक्स एज्युकेशन > Max Maharashtra impact: दिव्यांगांबद्दल मांडलेल्या समस्यांची दखल, सरकारचा मोठा निर्णय

Max Maharashtra impact: दिव्यांगांबद्दल मांडलेल्या समस्यांची दखल, सरकारचा मोठा निर्णय

Max Maharashtra impact: दिव्यांगांबद्दल मांडलेल्या समस्यांची दखल, सरकारचा मोठा निर्णय
X

Max Maharashtra च्या बातमीनंतर सरकारला जाग आली आहे.अखेर शासनाने दिव्यांग व्यक्तींना लेखनिक घेण्यासंदर्भात सुधारित परिपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या वर्ग-3 व वर्ग-4 परीक्षांमध्ये दिव्यांग परीक्षार्थींना लेखनिक घेण्यासंदर्भात विविध अडचणींचा सामना करावा लागत होता, शिवाय राज्य सरकारचे या घटकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे धक्कादायक वास्तव Max Maharashtra प्रतिनिधी गौरव मालक यांनी ground report च्या माध्यमातून मांडले होते. दरम्यान Max Maharashtra च्या बातमीने अखेर सरकारला जाग आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने दिव्यांग परीक्षार्थींना लेखनिक घेण्यासंदर्भात सुधारित परिपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था असावी, स्वतः लेखनिकाची निवड करता यावी, परीक्षा केंद्र दिव्यांगांच्या दृष्टीने सुलभ असावे, परिपत्रकामध्ये असलेल्या सर्व बाबींची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या आणि अशा इतर मागण्यांसंदर्भात Max Maharashtra च्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला होता. दरम्यान याबाबत शासनाने सुधारित परिपत्रक प्रकाशित करत बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत.

तर दुसरीकडे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने देखील प्रशासनाला अनेक वेळेला पत्रव्यवहार करण्यात आला होता. आता या मागण्या मान्य झाल्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या परिपत्रकाची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी होणार का ? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल.

Updated : 9 Oct 2021 5:30 PM IST
Next Story
Share it
Top