Home > मॅक्स एज्युकेशन > लंडनच्या विद्यापिठ निवडणुकीत भारतीय विद्यार्थ्याचा झेंडा

लंडनच्या विद्यापिठ निवडणुकीत भारतीय विद्यार्थ्याचा झेंडा

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील विद्यार्थी सुशांत सिंग याने एस.ओ.ए.एस. विद्यापीठ लंडन येथे विद्यार्थी संघ निवडणुकीत यश प्राप्त केले आहे.

लंडनच्या विद्यापिठ निवडणुकीत भारतीय विद्यार्थ्याचा झेंडा
X

सुशांत (Sushant) यांची विद्यार्थी संघाच्या वेलफेअर (Welfare of Student Union) गटात अध्यक्ष पदावर निवड झाली आहे. मागील वर्षी देखिल त्याने विद्यार्थी (students) संघ निवडणूक जिंकली होती. सुशांतचे कार्यक्षम नेतृत्व आणि समाजसेवेची बांधिलकी यामुळे त्याला दुसऱ्या टर्ममध्येही पुन्हा विजय मिळाला आहे. दलित समजल्या जाणाऱ्या समुदायातून ही निवडणुक जिंकणारा तो पहिला भारतीय विद्यार्थी ठरला असुन त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुशांतचा शैक्षणिक प्रवास २०२१ मध्ये लंडनच्या (London) एस.ओ.ए.एस (S.O.A.S) या मानवाधिकार क्षेत्रातील दर्जेदार विद्यापीठात सुरू झाला. मानवी हक्क, संघर्ष आणि न्याय या विषयात क़ायद्याचे उच्च शिक्षण त्याने घेतले. याआधी सुशांतने राष्ट्रीय विधि विद्यापिठ दिल्ली (Delhi) येथे वकिलीचा अभ्यास केला. आपल्या शैक्षणिक अभ्यासादरम्यान सुशांत वंचित समाजाच्या उन्नतीसाठी गरजू लोकांना मदत करत असतो.

विदेशातील विद्यापिठांत भेदभावविरहित वातावरण रहावे. जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संधी व शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रयत्न करत राहिल अशी प्रतिक्रिया सुशांतने दिली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी चेवेनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप (Deepak Chatap), डॉ.ऋषीकेष आंधळकर (Dr. Rishikesh Andhalkar) यांच्यासह भारतीय विद्यार्थ्यांनी सुशांतचे अभिनंदन केले आहे.

Updated : 14 March 2023 10:54 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top