बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा? सरकार झोपलय का ? अजित पवार संतापले
राज्यात कारवाई केली पाहिजे बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा... पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायच कसे, सरकार काय झोपलय का ? असा संपप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पेपरफुटी प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले. चौकशी करून या प्रकरणाचा संध्याकाळपर्यंत विधानसभेत निवेदन करू असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिले.
X
राज्यात कारवाई केली पाहिजे बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा... पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायच कसे, सरकार काय झोपलय का ? असा संपप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पेपरफुटी प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले. चौकशी करून या प्रकरणाचा संध्याकाळपर्यंत विधानसभेत निवेदन करू असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधानसभेत दिले. अभ्यास करणाऱ्या मुलांचे हे नुकसान असून या मागे कोणत रॅकेट कार्यरत आहे का ? त्याचा तपास करुन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहात केली. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, बारावीचे पेपर सुरु आहेत. आज सकाळी साडे दहा वाजताच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथे गणिताचा पेपर फुटला. गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. पेपरफुटीच्या मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का ? याची सखोल चौकशी केली पाहिजे. बारावीची परिक्षा देणाऱ्या मुलांचे हे नुकसान आहे. दोषीवर कठोर कारवाई करुन राज्यात सातत्याने सुरु असणारे असे गैरप्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तात्काळ चौकशीचे आदेश देऊन संध्याकाळपर्यंत निवेदन करू असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन दिल्यानंतर यावरील चर्चा थांबली .