Home > मॅक्स एज्युकेशन > शिक्षण मंडळाचा निर्णय, बारावीच्या विद्यार्थ्यांना ६ गुण मिळणार

शिक्षण मंडळाचा निर्णय, बारावीच्या विद्यार्थ्यांना ६ गुण मिळणार

बारावीच्या इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. इंग्रजी पेपरच्या त्रुटी असलेल्या प्रश्नाचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षक मंडळाने घेतला आहे.

शिक्षण मंडळाचा निर्णय, बारावीच्या विद्यार्थ्यांना ६ गुण मिळणार
X

बारावीच्या (12th Exam) पहिल्याच इंग्रजी पेपरमध्ये राज्य शिक्षण मंडळाकडून चुका झाल्याचे आढळून आले. त्यावर आता पांघरूण घालण्याचे काम शिक्षण मंडळाकडून सुरु आहे. ३ मार्च रोजी इंग्रजी विषयाची संयुक्त सभा पार पडली. या सभेमध्ये इंग्रजी विषयाचे तज्ञ आणि सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख उपस्थित होते. या सभेत झालेल्या निर्णयानुसार इंग्रजी पेपरमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना (Student) देण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले. तसेच या चुकीचा भूर्दंड बारावीच्या कोणत्याही विद्यार्थ्याला बसणार नसल्याचे सुद्धा मंडळाने स्पष्ट केले आहे.


बारावीच्या इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. सोमवारच्या प्रश्नपत्रिकेत a-३, a-४, a-५ या तीन कृतीमध्ये दोन प्रश्न छापण्यात आलेले नाहीत. तर एका प्रश्नाऐवजी उत्तरच छापण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले तर काही विद्यार्थ्यांनी तर गोंधळून प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. मंडळाने तयार केलेल्या नमुना उत्तरपत्रिका म्हणजेच मॉडेल आन्सर मधील a-३, a-४, a-५ ही उत्तरे सूचनांसह जशीच्या तशीच कृतिपत्रिकेत छापून आली होती. विद्यार्थ्यांनी या संभ्रमात प्रश्न न समजल्याने उत्तर टाळली आणि त्यांचे गुण आता वाया जाणार अशी भीती त्यांना वाटू लागली. यामुळे मंडळाने या प्रश्नाचे सरसकत गुण विद्यार्थ्यांना (Student) द्यावेत, अशी मागणी पालक, शिक्षकांमधून होत होती. या पार्श्वभूमीवर संयुक्त सभा घेऊन त्याच्या अहवालानुसार निर्णय घेतला जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Updated : 4 March 2023 6:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top