Home > मॅक्स कल्चर > भीमराव भोयर यांच्या 'शिक्षणवाटा चोखाळताना'ला पुरस्कार

भीमराव भोयर यांच्या 'शिक्षणवाटा चोखाळताना'ला पुरस्कार

भीमराव भोयर यांच्या शिक्षणवाटा चोखाळतानाला पुरस्कार
X

वर्धा येथील निवृत्त शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील विधायक कार्यकर्ते भीमराव भोयर यांच्या ' शिक्षणवाटा चोखाळताना ' या पुस्तकास नाशिक च्या सार्वजनिक वाचनालय संस्थेचा ग.वि. अकोलकर पुरस्कार जाहीर झाला आहे.१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हा पुरस्कार भोयर यांना वाचनालयाच्या सभागृहात प्रदान केला जाणार आहे.

भीमराव भोयर यांच्या 'शिक्षणवाटा चोखाळताना ' या पुस्तकाचा समग्र विचार करुन निवड़ समितीने ग.वि.अकोलकर पुरस्कारासाठी या पुस्तकाची निवड केली आहे. प्रस्तुत पुस्तक मराठी वाङ्ग्मयात मोलाचे आहे. भोयर यांचा ज्ञानसंचय त्यातून आविष्कृत होतो. १७५ वर्षाची दीर्घ परम्परा असणाऱ्या या सार्वजनिक वाचनालयाकडून दरवर्षी अशाच ग्रंथांना आणि ग्रंथकारांना आजवर सन्मानित केले जाते. महाराष्ट्रात आपल्या कर्तुत्वाने लक्षवेधी ठरलेल्या मोजक्या ग्रंथालयात या ग्रथालयाचे नाव येते. त्यामुळे भोयर यांचा सन्मान हा आपल्या दृष्टीने आनंदाचा ठेवा आहे.'

भोयर यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील डॉ. किशोर सानप , साहित्यिक अरुण जाखडे , प्रदीप दाते , डॉ. राजेंद्र मुंढे, डॉ. मनोज तायडे , संजय इंगळे तिगावकर या मान्यवरांनी भोयर यांचे अभिनंदन केले आहे .

Updated : 6 Nov 2017 9:29 PM IST
Next Story
Share it
Top