धार्मीक स्वातंत्र्य चळवळीचे नवे रुप – भाग ३
X
छत्रपती शाहू महराज किंवा १८४६ मधले शंभू राजे दुसरे संभाजी आभासाहेब यांच्या सनदा किंवा वटहुकुमामध्ये कोठेही या देवळाचा किंवा देवतेचा उल्लेख महालक्ष्मी असा नाही. शिवाय विद्यमान पुजाऱ्यापैकी एकाचेही नाव नाही. छत्रपती नियुक्त प्रधान यांच्याकडून भालचंद्र प्रधान अज्ञान (वय ७) असल्याचे कारण देऊन त्यांच्याकडून मंदिराचा ताबा कट कारस्थानाने घेतला. आपला लहान दत्तक भालचंद्रवर विष प्रयोग होईल, त्याला जीवे मारले जाईल या भितीपोटी त्या प्रधान कुटुंबाने मंदीराचा ताबा सोडला. मंदीराजवळचा प्रधानवाडा अतिक्रमण करून त्या कुटुंबाला देशोधडीला लावले. आपल्या जातीच्या न्यायाधीशाकडून हवा तसा निकाल लावून १९५२ मध्ये देवीच्या पूजेचा आणि आतील आमीषाचा हक्क जारीस हक्क मालवणकरांना देणे देणे भाग पाडले. ही सत्यकथा कटप्पाने बाहुबलीला का मारले या स्टाईलची आहे. आज मूळ पाचाचे पन्नास पुजारी झाले. छत्रपती शाहूंनी आम्हाला ताम्रपट दिल्याची लोणकढी थाप मारली. ती पटली.
मग सत्ता आणि संपत्तीचे वारे पुजाऱ्यांच्या डोक्यात चढले. कोट्यावधी रूपयांची बिनकष्टाची ताकद त्यांना त्यांना दारू, गुटख्यामध्ये घेऊन गेली. पहाटेच्या काकड आऱतीनंतर सोहळ्यावरच दासच्या गुत्त्यावर जाणाऱ्या पुजाऱ्यांना गरीब भाविकांनी सहन केले. त्यांचे ब्राम्हण म्हणून चालेलेले हे अशोभनीय वर्तन दृष्टीआड केले. या पुजाऱ्यांना निपुत्रिक म्हणून ओळखताना हा देवाचाच शाप अशावा अशी चर्चा सुरु झाली. या देवीला अर्पण केलेले सोन्याचे रत्नजडीत नेत्र चोरण्याइतपत यांची मजल गेली. त्याबद्दल गुन्हा दाखल होऊन शिक्षाही झाली. नवरात्रीत येणाऱ्या कोट्यावधींचे दाग, दागिने, उंची साड्या ठेवायला असंख्य फ्लॅट पुजाऱ्यांनी खरेदी केले. पण आयकराची धाड न पडण्याची व्यवस्था केली.
अजीर्ण होईल एवढा म्हणजे जवजवळ ६००० कोटी रूपये मिळूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा खटला दाखल झाला नाही. देवीचा प्रसाद, साडीवर ही प्रकरणे दाबली गेली. मग व्यापक कराचा भाग रचला गेला. या देवीचा, पार्वतीचा पती शिव, नजिकचं केदारलिंग किंवा ज्योतीबा. पण तिला केले तिरूपती बालाजीची पत्नी. बहुजनांच्या शिव-पार्वतीचे रूपांतर विष्णू महालक्ष्मी करणाऱ्याचा सडका मेंदू बहुजनांनी इतर प्रतिकेही बदलू लागला. देवीच्या मंदिरात दुर्गा व महिषासूर्मदिनी देवीच्या मूर्तीही त्यांनी सरस्वती, महालक्ष्मी केले. देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. मस्तकावरची नागफणी, सिंहवाहन तोडले. महालक्ष्मी कॅलेंडरला प्रेरणा दिली. रेल्वेचे नाव महालक्ष्मी, हरिप्रिया करून टाकले. त्यामुळ भवन वाढले, उत्पन्न वाढले. देवी पुजाऱ्यांसाठी एटीएम मशीन बनवले.
२६-११-१९५५ च्या दैनिक पुढारीत देवस्थान मंडळाकडून शैक्षणिक संस्था, वाचनालय, बाल गुन्हेगार सुधार केंद्रे, मुलींची वसतीगृहे या संस्थाना ५५ हजार रूपये मदत केली आहे. छ. शाहूंच्या १९१४ च्या वटहुकुमानुसार देवस्थानाकडे जमणाऱ्या दानाचा विनियोग १९५४ पर्यंत संस्थानातील खेडोपाडी सुधारणेसाठी होत होता. मात्र त्यानंतर पुजाऱ्यांनी सारा पैसा लाटला. देवस्थान मंडळाकडे फक्त ५/१० टक्केच राहिला.
नोट – वरील लेखातील मुद्दे हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. ‘मॅक्स महाराष्ट्र’ लेखकाच्या मतांशी पुर्णतः सहमत असेलच असे नाही.