Home > मॅक्स ब्लॉग्ज > आयुर्वेद (आयु + वेद = आयुर्वेद) 

आयुर्वेद (आयु + वेद = आयुर्वेद) 

आयुर्वेद (आयु + वेद = आयुर्वेद) 
X

आयुर्वेद जगातील प्राचीनतम् चिकित्सा प्रणालींपैकी एक आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. आयुर्वेद विज्ञान, कला आणि दर्शन ह्यांचं मिश्रण आहे. आयुर्वेद नावाचा अर्थच "आयुष्याचं ज्ञान" असाच आहे. आणि हाच संक्षेपरूपात आयुर्वेदाचा सार आहे.

हिताहितं सुखं दुःखम आयुस्तस्य हिताहितम्।

मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदः स उच्यते॥ -(चरक संहिता १/४०)

(अर्थात ज्या ग्रंथामध्ये - हित आयु (जीवनासाठी अनुकूल ), अहित आयु (जीवनासाठी प्रतिकूल),सुख आयु (स्वस्थ जीवन) आणि दुःख आयु (रोगावस्था) ह्या सर्वांचे वर्णन केलेले असते त्यालाच आयुर्वेद म्हणतात)

आयुर्वेद आणि आयुर्विज्ञान हे दोन्हीसुद्धा चिकित्सा शास्त्र आहेत. परंतु व्यवहारामध्ये चिकित्साशास्त्राच्या प्राचीन भारतीय पद्धतीला "आयुर्वेद" म्हणतात. आणि ऐलोपैथिक पद्धती (सामान्य भाषेत "डॉक्टर जी चिकित्सा करतात) तीला आयुर्विज्ञान असं म्हटलं जात.

आयुर्वेदाची व्याख्या

आयुर्वेद जगातील असे शास्त्र आहे ज्याचा अभ्यास केल्यावर आपण स्वतःच्या जीवनशैलीचं विश्लेषण करू शकतो.

(1) आयुर्वेदयति बोधयति इति आयुर्वेदः।

अर्थात जे शास्त्र (विज्ञान) आयु (जीवन) ह्यांचे ज्ञान घडवत त्यालाच आपण आयुर्वेद म्हणतो.

(2) स्वस्थ व्यक्ति आणि आतुर (रोगी) ह्यांच्यासाठी उत्तम मार्ग दाखवणाऱ्या शास्त्राला "आयुर्वेद" असं म्हटलं जात.

(3) अर्थात ज्या शास्त्रामध्ये आयु शाखा (वयाचं विभाजन), आयु विद्या, आयुसूत्र, आयु ज्ञान, आयु लक्षण (प्राण असल्याची लक्षण), आयु तंत्र (शारीरिक रचना/शारीरिक क्रिया) - ह्या संपूर्ण विषयांची माहिती मिळते त्यालाच "आयुर्वेद" म्हटलं जातं.

ह्या शास्त्राचे आद्य आचार्य "अश्विनीकुमार" मानले जातात. ज्यांनी दक्ष प्रजापतीच्या धडाला बकऱ्याचे शीर जोडले होते. अश्विनीकुमारांनी इंद्राकडून ही विद्या प्राप्त केली. काशीचे राजा दिवोदास धन्वंतरीचे अवतार मानले गेले. त्यांच्याकडून सुश्रुताचार्यांनी आयुर्वेद शास्त्र शिकले. अत्रि आणि भारद्वाज ऋषी सुद्धा ह्या शास्त्राचे प्रवर्तक आहेत.

खालील सर्वच आयुर्वेदाचे आचार्य आहेत.

अश्विनीकुमार, धन्वंतरि, दिवोदास (काशिराज), नकुल, सहदेव, अर्कि, च्यवन, जनक, बुध, जावाल, जाजलि, पैल, करथ, अगस्त, अत्रि आणि त्यांचे ६ शिष्य (अग्निवेश, भेड़, जातूकर्ण, पराशर, क्षीरपाणी, हारीत), सुश्रुत आणि चरकाचार्य ।

Updated : 5 May 2017 12:02 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top