Home > मॅक्स ब्लॉग्ज > तरुणाई आणि आंदोलन

तरुणाई आणि आंदोलन

कोरोना संकटामध्ये सर्व काही नकारात्मक सुरू असताना देशाच्या तरुणाई पुढे मोठं भविष्याचा आव्हान आहे. त्याची त्या ताकदीचा वेध घेतला आहे अभ्यासक विकास मेश्राम ‌यांनी..

तरुणाई आणि आंदोलन
X

Courtesy -Social media

तरुणपण यौवनावस्था ही एक अतिशय सुंदर मोहक नाजूक तरल, हजार नव्या आव्हानांना पारखुण घेणारी एक सुंदर अवस्था असते. तारुण्याच्या पंखात आकाशाला गवसणी घालण्याचे बळ असते म्हणूनच या अवस्थेला बळकट अवस्था म्हणता येईल... खर तर साऱ्याच स्वप्नांच्या उद्याच्या साऱ्या कल्पनांचा जन्म व विस्तार तरुण्यातूनच होतो. धुंद करणार्‍या बेंधुद क्षणातून उद्याचा सूर्य पाहण्याचा प्रयत्न असतोच तारुण्य, तारुण्य हे अभिप्राय नोंदविण्याचे वय नसते कधी. जगभर तरुणाई इतिहासच रचतोय...

बदल, क्रांती,उत्कांती हे सगळे तरुण घडवित आलेले आहेत तरुणाईचे विविध रुपे आपल्याला पाहायला मिळतात ,चंद्रावर जाणारी , अवकाशात विहार करणारी, पृथ्वीचा देठ शोधण्यासाठी रात्रंदिवस महाकाय प्रयोग करणारी तरुणाई ,आँलिपिक मध्ये विजयांचे पंख फडकवणारी तरुणाई .

तारुण्य म्हणजे प्रेम, शौर्य, साहस, त्यांग, पराक्रम, यांनी भरलेला महाबूक असून व्यावंस्थेविरुध्द बंड करून प्रश्न विचारणारी तरुणाई असते सर्व नव्या स्वप्नांचा परिपाक असतो तरुणाई केवळ आपल्याच स्वप्नाच्या दुनियेत रममाण होणे ही तरुणाई नव्हे तर न पटणार्‍या खटकणार्या गोष्टी धिटाईने सांगणे, त्या साठी आंदोलने उभारणे, सत्तेचे अनिर्बंध स्वरुप दिसू लावल्यानंतर सत्ताधीशांच्या आशनाखाली सुरूंग पेरण व व्यावस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी बेभानपणे आयुष्य उधळणे हे पण तरुणाईचे वैशिष्ट्ये आहे ...

आपल्या प्राचीन वैदिक ऋषी यांचे उदाहरण सांगता येईल तरुणपणी शंकराचार्य यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी हिंदू धर्म प्रसारकाचे कार्य केले जगाला सगळे मुलभूत तत्वज्ञान देणारे प्लेटो, अरिस्टाँटल, हे सगळे तरुण होते ,मानवी सम्यक विचाराचे कार्य बुध्दाने तारुण्यात केले, फ्रांस, अमेरिका या देशांत क्रांत्या झाल्या त्याचे शिल्पकार तरुणच होते, आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे सगळे नेते तरुण होते महात्मा गांधींच्या संपर्कात आलेले नेते जवाहरलाल नेहरू तेव्हा २६वर्षाचे, मौलाना अबुल कलाम आझाद ३५,सरदार पटेल ४० ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांनी आपल्या तारुण्यात परिवर्तनाचे लढे उभारले, वयाच्या २३ व्या वर्षी भगतसिंग फासावर गेले भारतीय स्वातंत्र्य लढा हा तरुणाईचा होता. त्यावेळेही तरुण आंदोलन करत होते, तेव्हा ही प्रस्थापित त्या तारुण्याला विरोधच करत होते.

ही सारी उदाहरण, तरुणांची क्रांती करण्याच्या, बदल घडवण्याची ताकद फार मोठी असते. जगाच्या इतिहासात, तत्त्वज्ञानापासून राजकारणात, जगण्याच्या सर्वच क्षेत्रात ही गोष्ट पुन्हा सिध्द झाली आहे, जगात जे जे बदल झाले ते तरूणांनी घडविले आहे .तरुण म्हणजे आपल्याच स्वप्नाच्या दुनियेत रममाण होणारा, मोरपंखी आठवणीत आकंठ बुडालेला एवढच चित्र नाही ,तरुणांनी कीती, चळवळी,लढ्याचे नेतृत्व केली आणि सरकारे उलथवली, मग तो रशियाचा पोलादी पडदा असो, की चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या हुकुमशाहीला आव्हान द्यायला तिआनमेन चौकात सरसावलेले विद्यार्थी असोत हे सगळे तरुणाई करतोय हा इतिहास आहे...

पेटलेल्या निखार्यावर राख जमते, हळूहळू राखेचा थर साचत जातो. त्यातली आग ठार मेलेली असते, पण निखारा सदैव फुललेला असेल, तर त्या वर राख जमा होत नाही,तरुणाईचे असंच आहे. प्रचंड अशा संख्येने असलेले तरुण अगदी निवांत शांत कसे कसे राहतील? या अस्वस्थेची कारण काळाण जन्माला घातलेल्या परिस्थितीत जरुर आहे, पण मुख्यत्वे कारण आर्थिक पण आहे. जिवनमरणाच्या प्रश्नाचा विसर पडण्यासाठी दिला जाणारा इतिहासाचा मुलामा, प्रतीक प्रतिमाची मांडामांड आणि भावनिक राष्ठप्रेमाची मात्रा सदासर्वदा लागू होईल अस नाही. कधी तरी यातली निर्थकता लक्षात येते. पोटात आग असतांना रिकाम्या हांताना रंगी बेरंगी फुगे उडवायला सांगण फार काळ चालून जाईल असंही नाही..

आज जो आपल्या देशात सुरू आहे ते एका अन्यायाविरुद्ध आंदोलन होत आहे, सरकार देशातल्या नागरिकावर एकाच मताची, विचारांची ,भुमिकाची सक्ती करू शकत नाही आणि ते लोकशाही प्रधान देशात शक्य पण नाही तरुणावर तर नाहीच नाही. सरकार राज्यघटनेला नख लावून लबाडी करीत असेल तर तरुण त्या विरोधात आवाज उठवणार, घटनेने जर न्याय ,स्वातंत्र्य ,समता, धर्मनिरपेक्षता ही मुल्य स्विकारली आहेत ,देश हा सर्वसमावेशक तत्वावर उभा आहे .

या मुल्यांना शासन तिलांजली देत आहे या सार्‍याविरोधात जर तरुण बोलत असतील, विरोध करत असतील तर त्याच्यावर हींसाचाराचा ठपका कसा घेता येईल, आजचे तरुण हे समतेच्या, न्यायाच्या मागणीसाठी माणुसकीच्या उत्थानाचे लढे आहेत त्यांना शत्रुच्या चष्मातून पाहणे हे आपल्या शासन व्यावस्थेचे करंटे पणा म्हणावे लागेल.. प्रस्थापितांच्या हित संबंधाचा विचार न करता समाजाला माणुसकीच्या दिशेने, परिवर्तनाच्या दिशेने जाण्याची गरज आहे आणि ते काम देशातले तरुणच करु शकतात...

विकास परसराम मेश्राम

मु+पो,झरपडा ता अर्जुनी मोरगाव

जिल्हा गोदिंया

मोबाईल नंबर ७८७५५९२८००

Updated : 31 May 2021 10:02 AM IST
Next Story
Share it
Top