Home > मॅक्स ब्लॉग्ज > World environment day: वारली चित्रकलेतून आदिवासी संस्कृती जगभरात पोहोचवणारी शीतल

World environment day: वारली चित्रकलेतून आदिवासी संस्कृती जगभरात पोहोचवणारी शीतल

World environment day: वारली चित्रकलेतून आदिवासी संस्कृती जगभरात पोहोचवणारी शीतल
X

वारली म्हटलं की आपल्या समोर उभा राहतो निसर्ग, आदिवासी संस्कृती. संस्कृतीचं वहन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सातत्यानं होत असतं. मुंबई सारख्या शहरामध्ये देखील वारली चित्रकला जोपासली जाते तसंच वाढवली जात आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. होय. हे शक्य आहे.

मुंबईतील आरेच्या जंगलात वारली चित्रकार शीतल बोराडे ही कला जोपासते. आरे कॉलनीत राहणाऱ्या शितलने आदिवासी संस्कृती आणि निर्सग संवर्धनाचे कार्य आपल्या वारली चित्रकलेतून जगासमोर आणलं आहे. तिची चित्र जागतिक पातळीपर्यंत पोहोचली आहेत.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मॅक्स महाराष्ट्रने शीतलशी संवाद साधला.

शीतल सांगतात की...

सभोवताली असलेल्या पर्यावरणाचा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळे अनेक संकट आपल्यावर आली आहे. जसं अवकाळी पाऊस, तौक्ते वादळ शहरी भागाचे व जंगलाचे मोठ्याप्रमाणावर झालेलं नुकसान. त्यामुळं आपण निसर्गाचं रक्षण करणं गरजेचं असल्याचं मत शितल व्यक्त करते.

सध्या पावसाळा सुरु झाला आहे. या पावसाळ्यात अनेक पक्षी आपली घरटी बांधतात आणि आसरा म्हणून झाडाला निवडतात. मात्र येणाऱ्या वादळांमुळे मोठ-मोठी झाडे पडतात. या पडलेल्या झाडांवर पक्षांची घरटी असतात. त्याच नुकसान होतं त्या घरट्यात पक्षांची पिल्लं असतात ते मरण पावतात. अशा प्रकारे पक्षांचा आसरा निघून जातो. त्याचबरोबर असे काही जंगलातील जीव, प्राणी आहे जे झाडांखाली दबून मरण पावतात. याचा आपल्यालाकडे फार विचार केला जात नाही. अशी हानी रोखण्यासाठी आपल्याला मोठ्याप्रमाणात वृक्षारोपन केलं पाहिजे. पर्यावरण वाचविण्यासाठी ध्वनी प्रदूषण, पाणी प्रदूषण देखील कमी केलं पाहिजे.

विकास करायला हवा परंतु पर्यावरणाला सांभाळून किंवा सोबत घेऊन केला तर ते मनुष्यजातीसाठी तसेच प्राणी, वन्यजीव, जंगलातील पक्षांसाठी सोईचे राहिल.

मी एक वार्ली चित्रकार आहे. वार्ली चित्रशैली ही मुळातच निसर्गावर आधारित आहे. यात झाडं, प्राणी, पक्षी, निसर्ग, नद्या, तलाव, डोंगर इ. पर्यावरणातील घटकांचा समावेश आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि जनजागृती मी माझ्या चित्रकलेच्या माध्यमातून करते असं शीतल बोराडे यांनी सांगितलं आहे.

Updated : 5 Jun 2021 11:35 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top