येणाऱ्या पिढ्यांसाठी पर्यावरण सुरक्षित राहील का?
X
आज जागतिक पर्यावरण दिन... पर्यावरणाचे संवर्धन करणे किती महत्त्वाचे आहे. हे सद्यस्थितीत येणारी नैसर्गिक आपत्ती पाहता प्रत्येकांच्या लक्षात आलंच असेल. निसर्गाचा समतोल राखणं किती महत्त्वाचं आहे. हे येणाऱ्या संकटांमुळे मानवीजीवनाला कळालचं असावं. पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण आणि सर्वसामान्य जनजीवन तसेच पर्यावरणाची काळजी कशी घेतली पाहिजे. पर्यावरणाचं संवर्धन करणं म्हणजे नेमकं काय? येणाऱ्या पिढ्यांसाठी पर्यावरण, ऑक्सिजन कसे सांभाळून ठेवलं पाहिजे? यासंदर्भात पर्यावरण तज्ज्ञ सुनील जोशी यांच्या बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे स्पेशल करसपाँडन्ट किरण सोनावणे यांनी...
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सुनील जोशी सांगतात की,
पर्यावरण हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे असे समजून काम करणारे लोकप्रतिनिधी नाहीत. जसे दोन पेक्षा जास्त मुलं असल्यास व्यक्ती निवडणूकीला उभा राहण्यास कायद्याने अपात्र ठरतो, तसे कायदे पर्यावरणासाठी बनवणे गरजेचे आहे. तेव्हाच पर्यावरण येणाऱ्या पिढ्यासाठी सुरक्षित राहील. अन्यथा दर दिवशी हे जग वाळवंट होण्याच्या मार्गावर प्रवास करत आहे.
प्रत्येक प्राणी, कीटक, डोंगर, ओढा हे पर्यावरण आणि जीवन साखळीचे घटक आहेत. तुम्ही पहा बेडूक नष्ट झाले तसे मच्छर वाढले. कारण मच्छर आणि मच्छराची अंडी, लरवा हे बेडकांचे मुख्य अन्न आहे. आज कोट्यवधी रुपये खर्च करून देखील मच्छर कमी होत नाही आहेत. या उदाहरणावरून पर्यावरणात प्रत्येक प्राण्याला पक्षाला किती महत्त्व आहे. हे पर्यावरण तज्ज्ञ सुनील जोशी यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना स्पष्ट केलं आहे.