धर्ममातंडाच्या टार्गेटवर महीला का असतात?
X
बुली बाई किंवा सुल्ली बाई (Bulli Bai and sulli bai App) सारख्या अॅपचा द्वेषाच्या राजकारणासाठी एक साधन म्हणून वापर केला जातो. संविधान विरोधी असणाऱ्या हिंदुराष्ट्र या संकल्पनेचा देखील समाजात दुही निर्माण करून द्वेषाचे वातावरण निर्माण करणे हाच उद्देश आहे.
काही घटकांकडून स्त्रीला नेहमी टार्गेट केले जाते. स्त्रीला धर्माशी आणि चरित्र्याशी जोडून तिचे नेहमीच शोषण केले जाते. स्त्रीवर हल्ला केला की तो त्या समाजावर हल्ला केला, अश्या प्रकारे सर्व वातावरण रंगवनं सोपं असतं. `बुली बाई` अॅप देखील त्याचाच प्रकार आहे. या सारख्या प्रकारांमध्ये लोकांचे प्रबोधन केले पाहिजे. आता आपल्या सर्वांना संविधानाचे रक्षक बनण्याची वेळ आली आहे. नाहीतर हे सर्व प्रकार आवल्या लोकशाहीला धोकादायक आहे, असं मत सीटीजन फॉर जस्टीस आणि पीस च्या सचिव Citizens for Justice and Peace (CJP) तिस्ता सेटलवाड यांनी व्यक्त केलं, प्रतिनिधी किरण सोनवणेंनी त्यांची साधलेला विशेष संवाद...