Home > मॅक्स ब्लॉग्ज > माना की अंधेरा घना है पर दिया जलाना कहा मना है..

माना की अंधेरा घना है पर दिया जलाना कहा मना है..

भोंदू कालिचरण दास याने महात्मा गांधी यांचा धर्मसंसदेच्या व्यासपीठावरुन अपमान केल्यानंतर सर्वत्र टीका होते आहे. पण अशा प्रवृत्ती का निर्माण होत आहेत, असे गैरसमज पसरवणाऱ्यांबाबत पुरोगामी वर्तुळातून कृती करण्यासाठी लोक पुढे का येत नाहीत? याचे विश्लेषण केले आहे पत्रकार, लेखक संकेत मुनोत यांनी....

माना की अंधेरा घना है पर दिया जलाना कहा मना है..
X

भोंदू कालिचरण दास याने महात्मा गांधी यांचा धर्मसंसदेच्या व्यासपीठावरुन अपमान तर केल्यानंतर सर्वत्र टीका होते आहे. पण अशा प्रवृत्ती का निर्माण होत आहेत. असे गैरसमज पसरवणाऱ्यांबाबत पुरोगामी वर्तुळातून कृती करण्यासाठी लोक पुढे का येत नाहीत? याचे विश्लेषण केले आहे पत्रकार, लेखक संकेत मुनोत यांनी....

कालीचरण हा साधू नसून संधीसाधू आहे पण तो जे बोलला ते एका दिवसात आले नाहीए...या विषारी गोष्टींचा वेगवेगळ्या ठिकाणी पद्धतशीरपणे प्रचार केला गेला आहे, अनेकांच्या मनात हे विष बिंबवले गेले आहे.

मी गेल्या काही महिन्यापासून एक-एक दिवस निवडून वेगवेगळ्या साधू-साध्वीना भेटायला जात आहे. एक दिवस निवडतो त्यात एक एक परिसर निवडून त्यातील साधू साध्वीना भेटतो, अनेकांना बोलावतो पण बहुतेक जणांना हे महत्वाचे वाटत नाही त्यामुळे 1-2जण मिळून जात असतो

त्यात संवाद साधताना बहुतेक ठिकाणी अश्याच गोष्टी दिसून आल्या..गांधींबद्दल प्रचंड द्वेष दिसून येतो सोबत मुस्लिम द्वेष ही त्यामुळे याबद्दल आश्चर्य वाटले नाही

एक गोष्ट लक्षात घ्या यासाठी संवाद होणे खूप आवश्यक आहे.जेवढे फेसबुक, व्हाट्सअप्प, मीडिया किंवा अन्य चळवळीचे कार्यक्रम इ. मध्ये यावर चर्चा करणे जेवढे आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त आवश्यक आहे अश्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन साधू साध्वीची भेट घेणे, चर्चा करणे संवाद करणे. हे काम खूप अवघड आहे 90 % ठिकाणी तर अपयश खात्रीने आहे तरीपण चिकाटीने प्रयत्न करत रहावे लागणार आहे...

मी याबाबत अनेकदा आपल्या वर्तुळात बोललो त्यातील अनेकांना त्या ठराविक वर्तुळाच्या बाहेरच यायचे नसते, काहींना याचे महत्व समजते आणि ते धार्मिक स्पेस वगैरे बद्दल भरभरून लिहतात, भाषण ही करतात पण स्वतःचे आचरण मात्र अगदी त्याच्याविरुद्ध करुन दारू पिऊन पुन्हा त्या धर्माला , धार्मिक लोकांना शिव्या देत त्यांना मूर्ख म्हणत बसतात.., काहींना समजुनही हे सोडायचे नसते कारण विचारले तर म्हणतात चळवळीतील लोक काय म्हणतील? ते हे विसरून जातात की लोकांची किंवा अगदी जवळच्या अनुयायांची वा लोकप्रियतेची पर्वा न करता गांधी भूमिका घेत होते आणि बदलत होते त्यामुळेच ते महात्मा बनू शकले..

गांधी असेपर्यत आणि ते गेल्यानंतर ही अनेक दशके धार्मिक ठिकाणच्या कोट्यवधी लोकांच्या मनावर त्यांच्या कार्याबद्दल विचाराबद्दल जाण होती व आजही काही ठिकाणी आहे..आचार्य विनोबा भावे,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा ही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज संत मंडळी उगाच का गांधींना प्रेरणा मानत होती?

पण सध्या चळवळीतील अनेक लोकांनी या लोकांशी संवाद पूर्ण तोडला हेही एक कारण आहेच हे पण आपण लक्षात घ्यायला हवे..

जिथे अनेक सुधारक धर्मावर कडवी टीका करतात,काही तो सोडला पाहिजे असेही म्हणतात किंवा सोडतातही , तरी त्या कुणावर ही हे धर्मांध लोक आज टीका न करता गांधीजींनाच का टार्गेट करतात ?

कारण गांधीजींचा धर्माचा अर्थ कोट्यवधी लोकांना जवळ आणत होता, त्यांच्यातील भेद कमी करत होता, त्यावरील ठराविक लोकांचे वर्चस्व नाकारून सर्वांना नेतृत्वाची संधी देत होता...तार्किक विचार करण्यास प्रवृत्त करत होता...त्यामुळे ज्यांना स्वतःच्या जातीचे वर्चस्व धोक्यात आलेले दिसले त्यांनी त्यांचा खून केला...

असो राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी त्यामुळेच म्हटले आहे कि मरते है हम तुम गांधी नही मरते....

प्रयत्न करत राहूया..

माना की अंधेरा घना है पर दिया जलाना कहा मना है..

चुकभुल क्षमस्व

संकेत मुनोत

संकेत मुनोत यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार

Updated : 29 Dec 2021 9:58 AM IST
Next Story
Share it
Top