शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अस्पृश्यांना दिली जाणारी वागणूक पुन्हा फोफावतेय का? जयवंत हिरे
X
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली 'महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह' पुकारला होता. आणि त्यांनी चवदार तळ्याचे पाणी पिऊन मानवीहक्कांची अस्पृश्यांची लढाई सुरू केली होती. त्या 'समता संगरा'चा दिवसाला आज ९४ वर्ष पूर्ण होत आहे. ९४ व्या वर्धापनाचा दिवस साजरा करताना मॅक्समहाराष्ट्रने सामाजिक कार्यकर्ते जयवंत हिरे यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी समाजातील सद्यस्थितीचा आढावा घेत आंबेडकरोत्तर ज्या समतेच्या चळवळीत आणि आंबेडकरांच्या अगोदरच्या काळातही पाण्यासाठीच्या ज्या लढाया झाल्या आहेत. त्याचा परामर्श घेतला आहे.
जयवंत हिरे सांगतात की... जात-धर्म व्यवस्थेने वंचित, अस्पृश्य वर्गाला पाणी नाकारल्यामुळे निर्माण झालेल्या लढाया, या वर्गाला धर्मव्यवस्थेनं नदीच्या पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार नाकारला होता. समतेच्या लढ्याला कटिबद्ध देण्यासाठी न्याय देण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवात केली. जो धर्म पशुला पाणवट्यावर येऊन देतोय आणि माणसांना पाणी नाकारतोय तो धर्म नसून विकृती आहे. असं म्हणत आंबेडकरांनी धर्मव्यवस्थेच्या विरोधात लढाईला सुरुवात केली.
महात्मा जोतिबा फुले यांच्या काळातही अशाच प्रकारे अस्पृश्यांना हिंदू धर्म वर्तवणूक देत होता. अस्पृश्यांच्या स्पर्शाचा देखील विटाळ केला जायचा, अस्पृश्यांना पाणी नाकारलं जात होतं. त्यावेळी महात्मा फुलेंनी अस्पृश्यांनी स्वतःच्या विहिरीच्या पाण्याची वाट मोकळी करुन दिली. स्वतःच्या हाताने पाणी घेण्यास सांगितलं, ही सामाजिक क्रांती डॉ. आंबेडकरांनी केलेल्या महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहा एवढीच मोठी आहे.
गाजियाबादमध्ये नुकतीच घडलेली घटना म्हणजे मुस्लीम समाजातील मुलगा आसिफ मंदिरात जाऊन पाणी प्यायला म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. अगदी अस्पृश्यांना पूर्वी जशी वागणूक देत होते. तशी वागणूक आज स्वातंत्र्याच्या काळात पाहायला मिळतेय. अशा या घटना मानवी जीवनाला अयोग्य आहे, समतेसाठी अयोग्य असून समाजासाठी अयोग्य असल्याचं म्हणत धर्मव्यवस्थेचा नायनाट करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहणे हीच चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनादिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरी आदरांजली ठरेल. एकंदरित धर्मव्यवस्थेनं समाजाला कशा पद्धतीने वेढलं आहे सांगतायेत सामाजिक कार्यकर्ते जयवंत हिरे पाहा हा व्हिडिओ