Home > मॅक्स ब्लॉग्ज > देशातील फुकटे कोण आहेत?

देशातील फुकटे कोण आहेत?

सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांना फुकटे म्हणणारे नक्की कोण आहेत? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख

देशातील फुकटे कोण आहेत?
X

स्वतः फक्त एक किंवा दोन पिढ्यांपूर्वी पर्यंत शासनाच्या फुकट किंवा सब्सिडाइज्ड शिक्षण / आरोग्य/ सार्वजनिक वाहतूक / पेन्शन देणाऱ्या योजना / म्हाडा, हडको सारख्या सरकारी संस्थांमधील घरे मिळालेले मध्यमवर्गीय गरिबांची फुकटे म्हणून संभावना करतात.

गरीब लोक "फुकटे" नसतात; त्यांची आर्थिक वंचितावस्था त्यांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांसाठी रांगा लावायला भाग पाडते. ते परिस्थितीने मजबूर असतात.

प्रत्येक प्रौढाला आत्मसन्मानाने जगावेसे वाटत असते; त्यासाठी पूर्वअट असते आत्मसन्मान राखणे परवडायला पाहिजे. (अफोर्डेबिलिटी);

तुमचा आर्थिक स्थर असा हवा की तुम्ही आत्मसन्मानाची निवड करणे तुम्हाला परवडायला हवे.

स्वातंत्र्यनंतर सत्तर वर्षे आत्मसन्मानाने जगण्यासाठी लागणारा भौतिक पाया देशातील बहुसंख्य नागरिकांना मिळाला नाही. ज्यांना मिळाला ते शासनाच्या सर्व फुकट योजनांना नकार देतील, देत असतात. गरिबांना "फुकटे" म्हणून हिणवू नका. त्यांचे भौतिक आधार शाश्वत पद्धतीने कसे वाढतील? यासाठी विचार करा; त्यांच्यातील अधिकाधिक कुटुंबे ते स्वतःहून अशा चवन्नी अठन्नी छाप योजनांना नाही म्हणतील. अशी आर्थिक धोरणे आखायला सरकरला भाग पाडू या.

हे परमार्थ म्हणून नव्हे. आपला समाज, राजकारण, पर्यावरण, अर्थव्यवस्था अधिक स्थिर आणि शाश्वत व्हावी यासाठी हे गरजेचे आहे. त्यात मध्यमवर्गीयांचा स्वतःचा स्वार्थ आहे.


Updated : 3 April 2022 8:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top