Home > मॅक्स ब्लॉग्ज > नेहरु आणि पटेलांना मुंबई महाराष्ट्राला का द्यायची नव्हती?

नेहरु आणि पटेलांना मुंबई महाराष्ट्राला का द्यायची नव्हती?

नेहरु आणि पटेलांना मुंबई महाराष्ट्राला का द्यायची नव्हती?
X

आज १ मे महाराष्ट्र दिन, मरणासाठी स्मशान कमी पड़त असताना आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. महाराष्ट्रातील माणूस जगण्यासाठी झगडत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राला पुन्हा एकदा उभी राहण्याची उर्मी देतो. माणसाच्या खांद्याला खांदा लावून मराठी मनांनी एकत्र येतं. महाराष्ट्र उभा केला. आज पुन्हा एकदा या संकटाला तोंड देत असताना महाराष्ट्राला त्या एकीची गरज आहे.

त्यामुळं मराठी भाषा, मराठी जनांचा प्रांत असलेला महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास आजच्या दिवशी समजून घेणं तुम्हाला नक्कीच आवडेल. आजचा महाराष्ट्र हा एका क्षणात स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आलेला नाही. त्यासाठी अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांच्याशी बातचीत केली.यावेळी मुक्ता मनोहर यांनी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन एकाच दिवशी कसे? मराठी भाषेचा एक प्रांत व्हावा, असा ठराव साहित्यिकांनी स्वातंत्र्यपु्र्व काळात का केला?

महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणी आणि केव्हा केली? श्रीपाद डांगे यांचा संयुक्त महाराष्ट्र कृती समितीमध्ये प्रवेश कसा झाला? महाराष्ट्र संयुक्त कृती समितीत लोकांचा सहभाग कसा वाढत केला? नेहरु आणि पटेलांना मुंबई महाराष्ट्राला का द्यायची नव्हती? पंडीत नेहरूंना प्रतापगडावर गेल्यावर महाराष्ट्राची ताकद कशी समजली? कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला कसे योगदान दिले? १ मे आणि हिटलरचा संबंध काय? प्रत्येक महाराष्ट्र दिनी आण्णासाहेब साठे यांचं स्मरण का केलं जातं…? यासारख्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा मुक्ता मनोहर यांचं विश्लेषण

Updated : 1 May 2021 9:34 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top