बागेश्वरने स्वीकारलं अंनिसचे आव्हान, आता पुढे काय?
X
गेल्या काही दिवसांपासून मुख्य माध्यमांमध्ये फक्त बागेश्वर धामच्याच चर्चा सुरु आहेत. त्यापार्श्वभुमीवर अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे शाम मानव यांनी बागेश्वर धामला आव्हान दिले होते. ते आव्हान बागेश्वर धामने स्वीकारले आहे. पण त्यासाठी मध्य प्रदेशातील रायपूर येथे येण्यास सांगितले आहे.
मात्र बागेश्वर महाराष्ट्रात न येण्याचे कारण महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे. त्यामुळे बागेश्वर धाम महाराष्ट्रात हारल्यास त्यांची रवानगी थेट तुरुंगात होऊ शकते. त्यामुळे बागेश्वर महाराष्ट्रात येण्यास घाबरत असल्याचा आरोप अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे माधव बावगे यांनी व्यक्त केले. या मुलाखतीत माधव बावगे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. नेमकं काय म्हणाले माधव बावगे? जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी घेतलेली ही बेधडक मुलाखत नक्की पहा....