Home > मॅक्स ब्लॉग्ज > मोदीजी अजिबात भेदभाव करत नाही!

मोदीजी अजिबात भेदभाव करत नाही!

56 इंचची छाती असलेल्या मोदींना का असुरक्षित वाटू लागलं असेल? वाचा विविधतेत एकता सांगणारे ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे विश्लेषण

मोदीजी अजिबात भेदभाव करत नाही!
X

कोंढवा आणखी वसायचं होतं, तेव्हा हाजी रशीद खान यांनी त्या परिसरात शिक्षण संकुल उभं केलं. शिक्षणाचा अभाव हे मुस्लिमांच्या शोषणाचं खरं कारण आहे. हे रशीद साहेबांनी ओळखलं होतं. रशीद साहेब गांधीवादी. कॉंग्रेसचे नगरसेवकही. नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत अनेकांचा सहवास लाभलेले. कमालीचे साधे आणि ध्येयनिष्ठ.

गोरगरीब मुला-मुलींसाठी त्यांनी स्वस्तात शिक्षण देणारी संस्था उभी केली. पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट. रशीद साहेब गेल्यावर त्यांच्या तीन तरूण मुली आता या संस्थेचा डोलारा सांभाळताहेत. आणि, ही संस्था आणखी वाढवताहेत. इथं आता हजारो विद्यार्थी शिकताहेत. ही मुलंही अशा वातावरणातली की ज्यांचा शिक्षणाशी पिढ्यानपिढ्या काही संबंध नव्हता.

संस्थेच्या प्रमुख प्राचार्य तबस्सुम शेख आणि प्राचार्य नाजेमा खान या दोघी परवा या कार्यक्रमात भेटल्या आणि हे फक्त मुलीच करू शकतात, याची खात्री पटली. माझे, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथाकार सन्मित्र सिकंदर सय्यद यांच्या अत्याग्रहाने जाणे झाले. गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संस्थेनं आयोजित केला होता.

तिथं विद्यार्थ्यांशी मनमुराद गप्पा मारल्या. स्वतः निरक्षर असणारे, पण काबाडकष्ट करून मुलांना शिकवणारे अनेक पालकही तिथे होते. नवा भारत कसा घडतो आहे, याची गोष्ट तिथं सुरू होती. 'भारत ही सतत घडत असलेली यशकथा आहे', असं नेहरू म्हणत, ते किती खरं वाटतं अशावेळी!

मराठी, उर्दू, इंग्रजी अशा तिन्ही माध्यमांतले विद्यार्थी होते. पण, बहुसंख्य पालक- विद्यार्थी उर्दू होते. हे लक्षात घेऊन ...हिंदीत मस्त जोरदार अर्धा तास बोललो. आणि, लक्षात आलं, गेल्या दोन दिवसांपासून मोदींना असुरक्षित वाटू लागलंय!

(संजय आवटे यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Updated : 25 Oct 2020 10:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top