Home > मॅक्स ब्लॉग्ज > भारताचे 'मेट्रोमॅन हे भाजपाच्या मेट्रो वर स्वार होवून पराभूत झाले. ..

भारताचे 'मेट्रोमॅन हे भाजपाच्या मेट्रो वर स्वार होवून पराभूत झाले. ..

जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असा दावा करत असलेल्या न भाजपाला केरळ विधानसभेत खातंही खोलता आले नाही. उलट देशाचे मेट्रोमॅन असलेल्या ई श्रीधरन यांना ८९ वर्षी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रोजेक्ट करून 39 वर्षाच्या काँग्रेस कार्यकर्ता शफी परंबिल कडून पराभूत होण्याची नामुष्की का पत्करावी लागली ? याचं विश्लेषण केलं आहे विकास मेश्राम यांनी...

भारताचे मेट्रोमॅन हे भाजपाच्या मेट्रो वर स्वार होवून पराभूत झाले. ..
X

मेट्रोमन ई. श्रीधरन यांची गणना देशात अव्वल तांत्रिक तज्ञांपैकी एक म्हणून केली जाते. कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रामाणिकपणा यामुळे देशातील अशक्य मानल्या जाणाऱ्या आधुनिक रेल्वे प्रकल्प वेळेच्या आधी पुर्ण केले आहेत . डॉ. कुरियन वर्गीस जसा श्वेत क्रांती आणि सॅम पित्रोदा दूरसंचार क्रांतीसाठी स्मरणात ठेवतात तसेच यांचेही नाव लोकांच्या स्मरणात आहे. तांत्रिक तज्ञ म्हणून त्यांनी सहा दशके देशाची सेवा केली. परंतु येथे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे की, मोठ्या योजनांच्या अंमलबजावणीत राजकारण्यांच्या हस्तक्षेपाकडे एकेकाळी शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारणारे ई. श्रीधरन राजकारणाच्या उंबरठ्यावर का पोहोचले? तेही या युगात जेव्हा मुरलीमनोहर जोशी यांच्यासारख्या दिग्गज वयामुळे भाजपाच्या मार्गदर्शक मंडळामध्ये समावेश केला जातो .

भारतीय सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तेत आमूलाग्र बदल करणारे ८९ वर्षीय ई. श्रीधरन यांनी नुकतेच भाजपचे सदस्यत्व मिळाले आहे. केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुका त्यांनी लढाव्यात अशी पक्षाची इच्छा आहे. ते म्हणतात की त्यांना भाजपमध्ये सामील व्हायचे आहे कारण ते नरेंद्र मोदींचे चांगले प्रशंसक आहेत. केरळच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणणे आणि राज्यातील उद्योग व्यवसायाचा विकास करणे हे त्यांचे ध्येय आहे. ते म्हणतात की कामगार धोरण आणि कामगार संघटनांच्या परस्पर विरोधी धोरणांमुळे राज्यात उद्योगांचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही, यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. परिणामी, मोठ्या संख्येने केरळ मधील लोक परराज्यात व बाहेर देशांत स्थलांतर करीत आहे.

काही लोक म्हणतात की ई. श्रीधरन हे देशातील अव्वल तांत्रिक तज्ञ अभ्यासक आहेत, त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत पाठवून मंत्री बनवले गेले पाहिजे जेणेकरून त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा आणि अनुभवाचा फायदा घेऊ शकेल. केरळमध्ये एक आमदार म्हणून ते किती काम करू शकतील हा एक प्रश्न आहे. वास्तविक, केरळमध्ये पक्षाचा पाया विकसित होऊ शकेल अशा राज्यात राष्ट्रीय ओळख असलेला चेहरा भाजपा शोधत होता.

ई. श्रीधरन, पुर्वी पहाटे चार वाजता उठून योग आणि ध्यान करून आपली दिनचर्या सुरू करत , पण आता वयानुसार त्याची दिनचर्या पहाटे पाच वाजता उठल्यानंतर सुरू होते. वयाच्या ८९ व्या वर्षी ते पूर्णपणे तंदुरुस्त आणि जागरूक आहे आणि नवीन राजकीय खेळी सुरू करण्यास तो उत्सुक आहेत. कठोर आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा कायम आहे. नव्वदच्या दशकात दिल्ली मेट्रो प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मा यांनी त्यांची निवड केली होती. त्यांची क्षमता, प्रामाणिकपणा आणि वरिष्ठ राजकीय नेतृत्वाच्या पाठबळामुळे त्यांची मोहीम अखंडितपणे सुरू राहिली. त्याचप्रमाणे रामेश्वरम ला तामिळनाडू शी जोडून वेळेच्या आधी प्रकल्प पूर्ण केले व कोकण रेल्वेमार्गाच्या अशक्य वाटणारे कार्य प्रत्यक्षात पुर्ण करून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यांना पद्मविभूषण व इतर पुरस्कारही मिळाले.

ई. श्रीधरन एक अतिशय कठोर आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी ते देशात सर्वाधिक मानधन घेणारा अधिकारी होते . तथापि, त्यांनी एखादी खासगी कंपनी निवडली असती तर त्यांना अनेक पटीने अधिक पगार कमविता आला असता. परंतु त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले आणि मोठा प्रकल्प अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केला. त्यांनी अत्यंत पात्र लोकांची एक टीम तयार केली आणि कठोर शिस्तीने लक्ष्य साध्य केले. खरोखरच, ई. श्रीधरन यांची योजना आणि कौशल्य ही लखनौ ते कोची या मेट्रोच्या योजनांच्या केंद्रस्थानी होती जी आज एक वास्तव बनली आहे. त्यांच्या समर्पणावरूनच हे सिद्ध होते की जेव्हा दिल्ली मेट्रोची योजना मूर्त स्वरूपात आली तेव्हा तो ऐंशी वर्षांचा होते. आजही त्यांच्या संभाषणात तीच उर्जा आणि उत्साह दिसून येतो.

वयाच्या ८९ व्या वर्षीची त्यांची आवड लक्षात घेण्यासारखे आहे ते म्हणतात की मला देशासाठी काहीतरी वेगळे करायचे आहे. या आग्रहानेच त्यांना राजकारणात आणले आहे. देशाने नेहमीच त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. याच कारणामुळे देशाच्या सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडवून आणले म्हणून ई. श्रीधरन यांना मेट्रोमन हे टोपणनाव देण्यात आले, माजी निवडणूक आयुक्त टी.एन शेषन हे ई.श्रीधरन यांच्या सोबत शाळा, महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेतले आहेत .तेव्हा ई. श्रीधरन यांची राजकीय खेळी आऊट झाली

भाजपाचे तिकीट मिळण्यापूर्वीच श्रीधरन यांनी 'लव्ह जिहाद' यासारख्या विषयावर मत व्यक्त करन लोकांना आपल्या वक्तव्याने आश्चर्यचकित केले होते. श्रीधरन यांनी फेब्रुवारीमध्ये एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, "लव्ह जिहाद, होय, मला माहित आहे केरळमध्ये काय घडत आहे." लग्नाच्या नावाखाली हिंदूंना कसे फसविले जाते आणि ते त्याचा बळी कसे बनतात…. केवळ हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन मुलींनाही लग्नाच्या नावाखाली फसवले जात नाही. आता मी अशा गोष्टींना नक्कीच विरोध करेन. '

गोमांस बंदीच्या मुद्दय़ावर श्रीधरन यांनी देखील सांगितले की ते पूर्णपणे शाकाहारी आहेत आणि कोणतेही मांस खायला आवडत नाही. देशद्रोहाच्या खटल्याचा सामना करत असलेल्या बेंगळुरूच्या 21 वर्षीय दिशा रवीच्या अटकेच्या संदर्भात त्यांनी जागतिक पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग यांच्याबरोबर 'टूलकिट' सामायिक केल्याबद्दल त्याला 'साहसी कृती' असे संबोधले होते. श्रीधरन म्हणाले होते, "मी म्हणेन की यामुळे देशाची प्रतिमा डागाळली आहे." त्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे असे मी म्हणत नाही, परंतु जे जगाच्या इतर जगासमोर देशाच्या प्रतिष्ठेला हानी पोहचवतात त्यांनी नक्कीच त्यांच्याशी कठोर असले पाहिजे. '

2019 मध्ये श्रीधरन यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिले होते, ज्यात महिला प्रवाशांसाठी मेट्रोचा प्रवास मोफत करण्याच्या 'आप' च्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने केलेल्या प्रस्तावाला त्यांनी मान्य केले नाही, त्यामुळे कर्जाची परतफेड रोखली जाईल, आणि मेटोची आर्थिक घडी बिघडेल असे म्हणत होते.मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ई श्रीधरन पलक्कड मधून 3,859 मतांनी पराभूत झाले. श्रीधरन काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले होते.

विकास परसराम मेश्राम मु+पो,झरपडा ता अर्जुनी मोरगाव जिल्हा गोदिया
मोबाईल नंबर ७८७५५९२८००
[email protected]

Updated : 4 May 2021 10:52 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top