पुन्हा एकदा 'मराठी' भाषेच्या प्रेमात पडूया: गणेश देवी
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त भाषेचं महत्त्व जगभरात मराठी भाषेचं स्थान आणि मराठी शब्दांची साधन संपत्ती कशी जोपासली पाहिजे. या संदर्भात पद्मश्री, भाषाशास्त्री गणेश देवी यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रने बातचीत केली. गणेश देवी सांगतात की...
X
जगात ७ हजार भाषा आहेत. यांपैकी हजारो भाषांचं भवितव्य अलीकडच्या काळात धोक्यात आलं आहे. भारतात २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार ९०० मातृभाषांचा समावेश असून त्यापैंकी १२१ भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली.
त्यातील २२ भाषांचा संविधानातल्या ८ परिशिष्ठाध्ये समावेश आहे. जगातल्या पहिल्या ३० भाषांमध्ये 'मराठी' भाषेचा क्रमांक लागतो. १ हजार वर्षांपेक्षा अधिक जुनी 'मराठी भाषा' आहे. अनेक देशात मराठी भाषिक पसरलेले आहे. मराठी भाषेची पाळंमुळं इंग्रजी, तेलगू, कन्नड, पोर्तुगीज अशा अनेक भाषेत जोडली गेली आहे.
सद्यस्थितीत आदिवासी भाषेकडे लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. कारण नवीन शब्दांची साधन संपत्ती ही या भाषेतून येत असते. ती आपण नाकारतोय. भाषिक विपुलता हा आपल्या नागरिकत्वाचा गुणधर्म आहे. जो आपण जोपसणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मराठी भाषेला अधिक बळकट करणं ही काळाची गरज असल्याचं साहित्यिक गणेश देवी यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगितले आहे.