Home > मॅक्स ब्लॉग्ज > दाभोळकरांच्या खुन्यांचा शोध का लावला जात नाही?

दाभोळकरांच्या खुन्यांचा शोध का लावला जात नाही?

दाभोळकरांच्या खुन्यांचा तपास लागत नाही, हे म्हणण्यापेक्षा लावायची इच्छा आहे का? आणि भविष्यात राहील का? पाहा सामाजिक विचारवंत संजय सोनावणी यांचे रोखठोक विश्लेषण

दाभोळकरांच्या खुन्यांचा शोध का लावला जात नाही?
X


आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला ७ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने सामाजिक विचारवंत संजय सोनावणी यांनी ढिम्म झालेल्या तपास यंत्रणा, न्यायपालिकेची विश्वासार्हता, राजकारण्यांचं दबावतंत्र आणि देश धार्मिकव्यवस्थेचं प्रतिक कसं बनलंय? यावर मॅक्समहाराष्ट्राशी बातचीत केली आहे.

संजय सोनावणी यांच्या मते, आज डॉ. दाभोळकर यांच्या हत्येला ७ वर्ष पूर्ण झाली. तरीही त्यांच्या खूनाचे सूत्रधार मोकाटच फिरतायेत. दाभोळकरांच्या खुन्यांचा तपास लागत नाही. म्हणण्यापेक्षा तो लावायची इच्छा आहे काय? आणि भविष्यात राहील काय? असा खरा प्रश्न आहे.

कारण यात जे धार्मिक, अंधश्रद्धाळू समजूती आणि परंपरेच्या वागण्याचा लोंढा आहे. त्या दबावाखाली दबले गेलेले राजकारणी जे तिरुपती, साईबाबा यांना नवस बोलतात. ते राजकारणी दाभोळकरांच्या खुन्यांचा तपास लावण्यामध्ये रस घेतील का? असा सवाल संजय सोनावणी यांनी केला आहे.

सध्या धर्मव्यवस्था देशाचे प्रतिक बनलं आहे. या धार्मिकतेविषयी ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला. त्यांना या जगातूनचं उठवलं गेलं. राजकीय पक्षांच्या हातचे पोपट, खेळणं बनलेल्या सीबीआय तपास यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि न्यायपालिका हे खरंच दाभोळकरांच्या खुन्यांना पकडतील का?

या सात वर्षात तपास यंत्रणेचा असंवेदनशीलपणा सगळ्यांनी पाहिला आहे. हिच यंत्रणा भविष्यात निष्पक्षपातीपणाने एखाद्या प्रकरणाचा तपास करतील का?

दाभोळकरांचे खुनी सापडत नाही. याला जेवढं शासन जबाबदार आहे. तेवढा समाजही जबाबदार आहे. असं सामाजिक विचारवंत संजय सोनावणी यांनी म्हटलं आहे.

पाहा हा व्हिडिओ…

https://youtu.be/n1r11twxXPI

Updated : 1 Nov 2022 10:05 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top