Monsoon2022 : मान्सून कधी येणार ? पाऊस का लांबला? वाचा तुमच्या मनातले प्रश्नं आणि त्यांची उत्तरं
X
पाऊस येणार पाऊस येणार.. अशी उत्सुकता प्रत्येकालाच आहे. हवामान तज्ञ आणि संस्था रोजच्या रोज हवामानाचे अंदाज देत आहेत. मान्सून कधी येणार? मान्सून का लांबला? कुठे पोचला? या आणि इतर तुमच्या आमच्या मनात असलेल्या प्रश्नांची शास्त्रोक्त उत्तरं दिली आहे, निवृत हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी...
प्रश्न १.मान्सून अटी पुर्ण करून केरळात खरचं दाखल झाला काय?
उत्तर : १-मान्सून आगमनाच्या सर्व अटी पुर्ण करूनच २९ मे ला केरळात दाखल झाला आहे. अटी अश्या आहेत 👇 मान्सून दाखल होण्याच्या घोषणेसाठी हव्या असलेल्या खालील ५ अटी पुर्ण केललेल्या आहेत.
i) जबरदस्त अ. समुद्रातून पश्चिमेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासुन उंच आकाशात साडेचार किमी जाडीत वाहणारे समुद्री वारे
ii)केरळाकडे जमीन समांतर ताशी ३० किमी वाहणारे समुद्री वारे
iii) आग्नेय अरबी समुद्रात व केरळ कि. पट्टी समोरील अलोट ढगाची दाटी
iv) संध्याकाळी अरबी समुद्रातून पाणी पृष्ठभागवरून प्रति चौ. मिटर क्षेत्रफळावरून १९० व्याट्स वेगाने उत्सर्जित होऊन बाहेर फेकणारी लंबलहरी उष्णताऊर्जा
v) केरळतील विखुरलेल्या १४ वर्षामापी केंद्रापैकी १० केंद्रावर अडीच मिमी व अधिक पावसाची झालेली नोंद
प्रश्न २. ह्या वर्षी मान्सून केरळात घोषित तारखेच्या दरम्यान दाखल झाला काय?
उत्तरः २- होय.
भारतीय हवामान खात्याने (IMD) १३ मे ला सांगितलेल्या बातमीनुसार देशात २०२२ चा मान्सून २७ मे ला अधिक व वजा ४ दिवसाच्या फरकाने म्हणजे उशिरात उशिरा म्हणजे ३१ मे पर्यंत अपेक्षित होता. मध्य संदर्भ चौकटीसाठी २७ मे तारीख विभागाकडून घोषित झाली. तारीख लक्षात ठेवली पण अधिक व वजा ४ दिवसाचा फरक लक्षात घेतला जात नाही. त्यानुसार मान्सून २९ मे ला केरळात दाखल झाला आहे.
प्रश्न : ३.मान्सून रेंगाळण्याची कारणे काय?
उत्तरः
i)जबरदस्त ताकदीचे बळकट वेगवान समुद्रातील नैऋत्येकडून भारतीय भू -भागावर वाहणाऱ्या अर्द्रतायुक्त वाऱ्यांचा अभाव.
ii) मान्सून झेपवण्याच्या कालावधीत ईशान्य अरबी व बंगालच्या समुद्रावर अधिक उंचीचे कमी दाब क्षेत्राच्या तसेच चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली निर्मितीचा अभाव
iii) मान्सूनच्या भुभागवरील देशाच्या मार्गांवर एमजेओ साखळीचा सध्या चालु असलेला प्रवास भारतीय उपखंडाच्या बाहेर म्हणजे फेज ७ व ८ दरम्यान चालु असल्यामुळे देशाच्या भू -भागावर पूर्व-मोसमी पावसाचा अभाव, पर्यायाने देशात मोसमी पाऊस झेपवण्यास सध्या प्रतिकूलता तयार झाली, व मान्सून प्रगतीस अडथळा जाणवू लागला.
प्रश्न ४. मान्सून उर्जीतावस्थेत कधी येणार?
एम.जे.ओ साखळी भारतीय समुद्रावर मध्यम स्वरूपात का होईना फेज २ व ३ दरम्यान साधारण १८ जून दरम्यान प्रवेशित होत असुन ३० जून दरम्यान बाहेर पडेल. त्याची उपस्थितीची मान्सून उर्जीतावस्थेसाठी मदत होवु शकते.दोन दिवसानंतर दि. ८-९ जून (बुधवार-गुरुवार )पासुन कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात मध्यम अवकाळी पूर्व मोसमी पावसाची शक्यता जाणवते. रेंगाळलेल्या मोसमी (मान्सून )पावसाच्या प्रगतीसाठी ह्या पावसाचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा आहे.
प्रश्न ५. महाराष्ट्रात तळकोकणात आणि मध्य व उर्वरित महाराष्ट्रात कधी येणार?
उत्तरः महाराष्ट्रात तळ कोकणात साधारण ११ जून च्या दरम्यान मोसमी पावसाची शक्यता जाणवते. त्यानंतरील अनुकूल वातावरणाच्या उपलब्धतेवर पुढील २-३ दिवसात सह्याद्री ओलांडून उर्वरित महाराष्ट्रात त्याचे आगमन अपेक्षित वाटते .
प्रश्न ७. हवामान खात्याच्या अंदाजात विसंगती जाणवते काय?
उत्तर : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजात मुळीच कोणतीही विसंगती नाही..
माणिकराव खुळे,
Meteorologist (Retd.), IMD पुणे.
ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.