भारताची वाढती 'भूक' कोण भागवणार?
जगासाठी 'भारत' ही मोठी बाजारपेठ आहे. म्हणूनच जगभरातील अन्नधान्य प्रक्रिया उद्योगातील उद्योग मुंबईमध्ये आले आहेत.140 कोटी लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी ब्राझील,कोरिया, तैवान,अमेरिका, हॉलंड का उत्सुक आहे? कारण या देशातील अमाप नैसर्गिक संपदा आणि स्वस्तात मिळणारे मनुष्यबळ आणि अफाट वैविध्यपूर्ण मार्केट ही भारतासाठी जमेची बाजू आहे. म्हणूनच वेगाने बदलणाऱ्या अन्नप्रक्रिया उद्योगाचा AnuTech &Food प्रदर्शन 2023 च्या निमित्ताने MaxKisan चे संपादक विजय गायकवाड यांनी घेतलेला आढावा...
X
आतापर्यंत आपण मॉडर्न खाद्यपदार्थ म्हणजे प्रगती समजत होतो. मध्यमवर्गीय जसा आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला तसा लाईफस्टाईल सोबत खाद्याबद्दलही जागृत झाला.
AnuTech &Food प्रदर्शन 2023 मध्ये चार नंबरच्या हॉलमध्ये पापडाच्या स्टॉलवर एक स्टॉल होता ज्वारी, बाजरी आणि नाचणी ही भरडधान्य आता इतिहास जमा झाल्याचे चित्र आहे. पण UN यंदा आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष जाहीर केले. भारताने प्रतिसाद देत बजेटमध्ये भरपूर तरतूद केली. परिणाम भरडधान्यापासून फक्त ‘भाकरी’ बनविता येते हा कन्सेप्ट आता मागे पडला आहे.
भरड धान्याचे फक्त भाकरी होते या पारंपरिक गृहितकाला छेद देत या धान्यांपासून पोहे, चिवडा, रवा, इडली- डोसा पीठ, चकली, शंकरपाळे या प्रदर्शनात मांडले होते.
‘देवळाली प्रवरा’ येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांच्या ‘स्टार्टअप’च्या उत्पादन या प्रदर्शनात सर्वांचे आकर्षण होतं.
सरोजिनी फडतरे यांचा देवळाली प्रवरा येथे ही 'समृद्धी ऍग्रो ग्रुप' या नावाने धान्य प्रक्रिया उद्योग आहे. या उद्योगाच्या माध्यमातून ज्वारीचा रवा, पोहे, इडली मिक्स, ज्वारी चिवडा, बाजरी पोहे, नाचणी रवा, इडली व डोसा मिक्स, ज्वारी बाजरी नाचणीची पीठ आदी उत्पादने घेण्यात येतात. ही सर्व उत्पादनांची गुणवत्ता चांगली असल्याने त्यांना भारताबाहेर अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ही बाजारपेठ मिळाली आहे. आता मिश्रधान्यांचे ‘कुरकुरे’ उत्पादनही सुरु केले आहे.
या उत्पादनांची माहिती देताना तात्यासाहेब फडतरे म्हणाले,"ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या लागवडीपासून ते प्रक्रिया उद्योगाच्या या प्रवासात जिल्ह्यातील सेंद्रीय पध्दतीने शेती करणारे अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मॉडर्न पद्धतीने झटपट खाण्यासाठी ज्वारी, बाजरी आणि नाचणी पासून बनविलेल्या पदार्थांचे या उद्योगांतून मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. स्थानिक पातळीवर या पदार्थांच्या विक्रीसाठी देवळाली प्रवरा येथे ‘मॉल’ ही सुरू करण्यात आला आहे. ऑनलाईन विक्रीसाठी www.gud2eat.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘गुड टू इट’ या नावाने ब्रॅँड विकसित करण्यात आला आहे.'
सरोजिनी फडतरे यांना या उद्योगात कृषी पदवीधर असलेले त्यांचे पती तात्यासाहेब फडतरे यांची ही मोलाची मदत होत आहे. श्रीमती फडतरे या स्वत: गृहविज्ञान शाखेच्या पदवीधर आहेत. आज पुण्यामध्ये १६३ ठिकाणी ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय मुंबई, नाशिक, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी उत्पादनांची विक्री होत आहे. महाराष्ट्राबाहेर एकूण अकरा ठिकाणी पदार्थांची विक्री होत आहे. अमेरिका, दुबई, स्पेन देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी त्यांचे नातेवाईक ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ आवर्जून घेऊन जातात. त्यामुळे परदेशात पदार्थांची लोकप्रियता वाढली आहे.
राज्यभरातून मागणी वाढल्यामुळे दोराबजी, फूडप्लस, राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, डायबेटिक ट्रॉमा सेंटरमध्ये ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परराज्यांतून मागणी वाढल्याने कुरिअरद्वारे माल पाठविला जातो. शहरातील नागरिकांना ज्वारी, बाजरी आणि नाचणीचे महत्त्व कळावे यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
ही झाली प्रदर्शनातली एक स्टोरी. परंतु प्रक्रिया उद्योगातील AI तंत्रज्ञान, प्रक्रिया मशिनरी, कृषी प्रक्रिया उद्योजक, आयात निर्यात सल्लागार, सगळेच या ठिकाणी एका व्यासपीठावर होते . प्रदर्शनाबरोबरच शेतमाल प्रक्रिया उद्योगातील संधी आणि आव्हान या विषयावर चर्चासत्र देखील सुरू होते.
अलीकडेच कांदा आणि टोमॅटो या शेतमालाच्या किमतीच्या चढउतारावरून मोठे राजकारण झालं. शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड दिली तर हा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो असं तज्ञांचे म्हणणं आहे.
राज्याच्या शेतमाल निर्यात धोरणाचे अभ्यासक गोविंद हांडे म्हणतात, शेतमालावर प्रक्रिया केली तरी उत्पन्नात १० ते २० टक्के वाढ होते.
सर्वसामान्य शेती उद्योजकाने सर्वप्रथम प्राथमिक आणि मग इतर मोठ्या प्रक्रियेकडे वळावे. ग्रामीण भागात प्रक्रियेसाठी खूप संधी आहेत. भाजीपाला प्रक्रियेत आपण खूप मागे आहोत. नवीन प्रक्रिया उद्योग सुरू करताना सर्व प्रमाणपत्रे, पॅकेजिंग, ब्रॅन्डिंगच्या अनुषंगाने काम करण्याची गरज आहे.
सल्ला सेवा ः शेती व संलग्न व्यवसायातील नवीन लोकांना व्यावसायिक तत्त्वावर सल्ला, सेवा, मार्गदर्शन देण्याच्या विपुल संधी आहेत. धनिक लोकांना त्यांची शेती विकसित करण्यासाठी शेती व्यवस्थापकांची गरज असते. उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवून देणाऱ्या व्यक्तींची गरज भासते. त्यांच्यासाठी ते चांगली किंमत मोजायलाही तयार असतात. कृषी व्यवसायांना विशेषतः दुग्धव्यवसाय, अन्नप्रक्रिया, निर्यात या व्यवसायांमध्ये अधिक संधी आहेत. आपल्याला नक्की काय करायचंय हे आधी ठरविले पाहिजे. आपल्या भागातील अतिरिक्त उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे, ही पहिली पायरी असू शकते. उपलब्ध गोष्टींचा पुरेपूर वापर केला व्यवसायात निश्चितच यश मिळू शकेल.
शकतो. एकट्या शेतकऱ्याला हे थोडेसे अडचणीचे असले तरी गावातील शेतकऱ्यांना एकत्र आणून वा गटामार्फत यात खूप चांगले काम करता येऊ शकते. विक्री पद्धत व पॅकेजिंगमध्ये महत्त्वाचे बदल होत आहेत. ते लक्षात घेऊन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आदी बहुराष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलवरून विक्री करणे शक्य आहे. त्याबाबत माहिती मिळविणे गरजेचे आहे.
प्रक्रिया हे उत्पन्नवाढीचे फार मोठे साधन आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण ज्वारी, मका, रागी, सेंद्रीय डाळ अशा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग उभे करून यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.
सरोजिनी फडतरे यांना या उद्योगात कृषी पदवीधर असलेले त्यांचे पती तात्यासाहेब फडतरे यांची ही मोलाची मदत होत आहे. श्रीमती फडतरे या स्वत: गृहविज्ञान शाखेच्या पदवीधर आहेत. आज पुण्यामध्ये १६३ ठिकाणी ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय मुंबई, नाशिक, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी उत्पादनांची विक्री होत आहे. महाराष्ट्राबाहेर एकूण अकरा ठिकाणी पदार्थांची विक्री होत आहे. अमेरिका, दुबई, स्पेन देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी त्यांचे नातेवाईक ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ आवर्जून घेऊन जातात. त्यामुळे परदेशात पदार्थांची लोकप्रियता वाढली आहे.
राज्यभरातून मागणी वाढल्यामुळे दोराबजी, फूडप्लस, राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, डायबेटिक ट्रॉमा सेंटरमध्ये ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परराज्यांतून मागणी वाढल्याने कुरिअरद्वारे माल पाठविला जातो. शहरातील नागरिकांना ज्वारी, बाजरी आणि नाचणीचे महत्त्व कळावे यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रक्रिया उद्योगातील प्रगतीमुळे त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार मिळाले आहेत.
आपल्या प्रवासाविषयी सांगताना सरोजिनी फडतरे म्हणतात,'संसाराचा व्याप वाढल्याने गाव सोडले आणि थेट हैद्राबाद येथे ई टीव्हीच्या अन्नदाता या नियतकालिकात ते उपसंपादक म्हणून रूजू झाल. २००६ ते २००८ ह्या दोन वर्षात हैद्राबाद मधली भाषा आणि खाद्य संस्कृती यांचा मेळ काही बसेना. खूप दूर आल्यासारखी भावना सतत व्हायची. म्हणून तिथेही राजीनामा देऊन पुण्यात एक कृषीविषयक नियतकालिकात पतीनी उपसंपादक म्हणून काम सुरू केले.
पतीचे बचत गटांना प्रॉडक्ट बनवण्याचे आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्याचे काम होते. ह्या कामात खूप ओळखी झाल्या. त्यांनी सात राज्यांचा जवळून अभ्यास करता आला..
सन २०१२ मध्ये संधी चालून आली. कृषी विभागाने भरडधान्य विकास कार्यक्रमाची योजना सुरू केली होती. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्यांवर भरड प्रक्रिया करून विविध उत्पादनं तयार करण्याची कल्पना अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून पुढे आली आणि हे क्षेत्र नाविन्यपूर्ण असूनही यात व्यावसायिक संधी भरपूर निर्माण करता येतील अशी आशा पल्लवित झाली. विचारांती मी पूर्णपणें आणि पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. वडापुरी ता. इंदापूर जि पुणे येथे दहा जणांचा बचतगट केला. आमचे , दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मगर साहेब यांचे मदतीने बचत गट स्थापन केला आणि माझ्या उद्योगाचा श्रीगणेशा झाला. मी होम सायन्स पदवीधर असल्याने सर्व उत्पादनाचा प्रयोग आधी घरात होत असे. त्यात यश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात ते करत असू. २०१२ मध्ये पुण्यात भरलेल्या कृषी प्रदर्शनात आमच्या उत्पादनांना विक्रीसाठी पहिले व्यासपीठ मिळाले. पण नोकरीचाच अनुभव गाठीशी असल्याने ग्राहकांपर्यंत पोहोचताच येईना. ही बाब कृषी अधिकारी अर्जुन फुले यांच्या लक्षात आली, त्यांनी पहिला धडा शिकवला. ग्राहकांनी काही घेवो किंवा न घेवो , त्यांना आपले प्रॉडक्ट देऊन धीटपणे संवाद साधायचा. झाले...मनाने ही हिय्या केला आणि पहिल्याच दिवशी नऊशे रुपयांची तर चार दिवसात साडे चार हजार रुपयांची विक्री झाली.
त्यानंतर आत्मविश्वास दुणावला आणि ग्राहकांचे जाळे प्रदर्शनाच्या माध्यमातून खूपच वाढले. त्यातूनच पुण्यातील एका महिलेने पन्नास जणांसाठी ज्वारीच्या इडलीची ऑर्डर दिली. ती सर्व इडली आम्ही घरी बनवून पोहोच केली आणि होम डिलिव्हरी चा टप्पा सुरु झाला. त्याच दरम्यान कोकणातील एक इडलीची ऑर्डर आली आणि आता कोकणात कशी द्यावी हा प्रश्न पडला. मग मी त्यांना म्हणालो की मी पीठ तयार करून देतो , तुम्ही ते भिजवून इडली तयार करा. अशा तऱ्हेने इडली मिक्स चा जन्म झाला. ग्राहकांची नाडी ओळखून प्रक्रियेचे पुढचे दालन खुले झाले.
आमच्या उद्योगाचे स्वरूप २०१३ मध्ये विस्तारले. देवळाली प्रवरा येथे ही 'समृद्धी ऍग्रो ग्रुप' या नावाने धान्य ग्रेडिंगचे युनिट सुरू केले. खरंतर ज्वारी , बाजरीच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणे सोपे नव्हते. पण उत्पादनांच्या विक्री बरोबरच नाचणीतील लोहामुळे मुलींमधील रक्तक्षय कमी होण्यास मदत होते, ज्वारी आणि बाजरीतील कर्करोग , मधुमेह प्रतिबंधात्मक गुणधर्म मी ग्राहकांना पटवून देत होतो. आरोग्यदायी अन्नाची संकल्पना लोकांमध्ये रुजवण्यास सुरुवात केली.
आमच्या कामाची वाखाणणीही समाजात होण्यास लगेचच सुरुवात झाली. २०१३ मध्येच आम्हाला सहयाद्री वाहिनीचा नवउद्योजकांचा पुरस्कार मिळाला आणि प्रथमच दूरचित्रवाणी वर झळकलो. पैशांपेक्षा प्रसिद्धी खूप लवकर मिळाली. २०१५ मध्ये आमच्या उत्पादनांचा संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक आला. २०१९ मध्ये ऍग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार मिळाले.
ऑक्टोबर 2022, महाराष्ट्र राज्य पातळीवर स्टार्टअप यात्रा शेती मध्ये काम करणाऱ्या प्रथम पारितोषिक महिला म्हणुन एक लाख रु सन्मान चिन्ह असा पुरस्कार राज्याचे महामहीम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आल्या.
आमची उत्पादने जसे ज्वारीचा रवा, पोहे, इडली मिक्स, ज्वारी चिवडा, बाजरी पोहे, नाचणी रवा, इडली व डोसा मिक्स, ज्वारी बाजरी नाचणीची पिठं यांची गुणवत्ता सर्व निकषांच्या कसोटीवर उतरली आणि त्यांना भारताबाहेरही जसं की अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ही बाजारपेठ मिळवली आहे. आता मिश्रधान्यांचे कुरकुरे ही सुरु केले आहेत.
आमचा दिवस भल्या पहाटे सुरू होऊन रात्री उशिरा मावळतो. सर्वांचे कष्टच मला खरंतर समृद्धीकडे घेऊन आले. सरोजबरोबरच आमच्या वेलीवर आलेली दोन फुलं , माझ्या दोन्ही कन्या ह्यांनी ही त्यांचं बालपण आमच्या फरफटीत घालवले. चिकाटी आणि जोखीम पत्करण्याची तयारी, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि मित्रांच्या शुभेच्छा असल्याने मानहानी, संयमाची परीक्षा पाहणाऱ्या कटू प्रसंगातही एकमेकांना सांभाळत आमच्या बरोबरच ज्वारीलाही समृद्धीचे दिवस आणण्यात आम्ही यशस्वी झालो. शून्यातून उभा केलेला हा प्रकल्प आता दिमाखाने आपली ध्वज पताका परदेशातही मिरवत आहे.
एकंदरीतच या प्रदर्शनातून झालेल्या चर्चा सत्रातील एक सूत्र पुढे आले. वीस वर्षांपूर्वी चीन ज्या टप्प्यावर उभा होता, त्याच टप्प्यावर भारत उभा आहे. चीनला मागे टाकून आपण लोकसंख्येत पहिला क्रमांक मिळवला आहे परंतु या वाढीव लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठी संधी आहे मल्टिनॅशनल कंपन्यांबरोबरच स्टार्टअपने देखील वायू वेगाने काम करायला सुरुवात केली आहे.
आगामी काळात २०३० पर्यत विकासदरामधे (GDP) अन्नप्रक्रीयेचा २० टक्के वाटा असेल असा विश्वास ANUTEC आणि ANUFOOD इंडिया 2023 प्रदर्शनात व्यक्त करण्यात आला आहे. भारत जगाच्या अन्न पुरवठ्याचे केंद्र असून आपल्याकडे मुबलक कच्चा शेतमाल आणि प्रक्रीयेची क्षमता उपलब्ध असल्याने जागतिक स्तरावर अन्न प्रक्रिया आणि निर्यातीसाठी जगाचे भारताकडे लक्ष आहे. आगामी काळात २०३० पर्यत विकासदरामधे (GDP) अन्नप्रक्रीयेचा २० टक्के वाटा असेल असा विश्वास ANUTEC आणि ANUFOOD इंडिया 2023 प्रदर्शनात व्यक्त करण्यात आला आहे.
अन्न आणि अन्न प्रक्रीया तंत्रज्ञान क्षेत्राची आधुनिक दालनं प्रदर्शीत करणारी ANUTEC - इंटरनॅशनल फूडटेक इंडियाचे 17 वे प्रदर्शन ANUFOOD इंडिया आणि PackEx India यांच्या सह बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई येथे पार पडले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात एमएसएमई मंत्रालयाचे संयुक्त सचिव मर्सी इपाओडॉ. जे.पी. डोंगरे - उप कृषी विपणन सल्लागार, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय (MOFPI); ऑलिव्हर फ्रेसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोलन्मेसे, मिलिंद दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, कोलन्मेसे इंडिया या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणखी वाचा - दिवसा आणि मोफत वीज द्या : प्रताप होगाडे असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट (एएफएसटीआय) चे अध्यक्ष; डॉ. एन. भास्कर, आणि ऑल इंडिया फूड प्रोसेसर्स असोसिएशन (एआयएफपीए); डॉ. राघव उपस्थित होते. 38,000 sqm च्या विस्तृत प्रदर्शन केंद्रात 28 पेक्षा जास्त देशांतील 800 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ब्राझील, फिलीपिन्स, तुर्की, इंडोनेशिया, कोरिया, इटली आणि इराणमधील विशेष पॅव्हेलियन्स देखील प्रदर्शनात आहेत. प्रमुख प्रदर्शकांमध्ये हीट अँड कंट्रोल, एस टेक्नॉलॉजीज, अपोलो व्हीटीएस इंडिया, सीमेन्स, बोसर पॅकेजिंग इंडिया, निक्रोम इंडिया, गोपाल स्नॅक्स, शुभम गोल्डी मसाला, पुष्प ब्रँड (इंडिया), टाटा ग्राहक उत्पादने, अमर चहा, हल्दीराम स्नॅक्स, इतर अनेकांमध्ये. उद्योग भागधारक आणि AIFPA, IFCA, FFFAI, SIB आणि AFSTI सारख्या संस्था सहभागी आहेत. आपल्या उद्घाटन भाषणात, भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे एमओएस, प्रल्हाद सिंग पटेल म्हणाले, "आजचे प्रदर्शन 'आत्मनिर्भर भारत' चे प्रतिनिधित्व करत आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना (PMKSY), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम (PMFME) योजना आणि उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना हे तीन महत्त्वाचे कार्यक्रम आहेत जे आमच्या मंत्रालयाने राबवले आहेत. या उपक्रमांमुळे आमच्या उद्योगाला जागतिक गुणवत्ता आणि गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. सुरक्षा मानके, संपूर्ण अन्न प्रक्रिया मूल्य साखळीला फायदेशीर ठरते. भारत सरकारने PMKSY टिकवून ठेवण्यासाठी रु. 4600 कोटींची तरतूद केली आहे,
आणि अलीकडेच, PMKSY ला अतिरिक्त रु. 920 कोटींचे वाटप, क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विकासासाठी दिले आहेत." आणखी वाचा - डिजिटल क्रांतीनं जगणं अवघड केलं:सोमिनाथ घोळवे मर्सी इपाओ, संयुक्त सचिव (SME), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार, म्हणाले, “MSMEs भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, जीडीपीच्या 30% पेक्षा जास्त, जवळजवळ 50% निर्यात आणि औद्योगिक उत्पादनाच्या 45%. मंत्रालय सुमारे 20 विशेष कार्यक्रम चालवते. मंत्रालयाची "झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट (Z) योजना" प्रथमच निर्यातदारांना मदत करताना पर्यावरणीय स्थिरतेला प्रोत्साहन देते. एमएसएमईंना वैविध्य आणण्यासाठी मदत करण्यासाठी 50,000 कोटींचा स्वावलंबी भारत निधी देखील तयार करण्यात आला आहे. कोविड-19 च्या समस्या असतानाही, प्रादेशिक असमानता कमी करणे आणि लवचिकता वाढवणे ही प्रमुख प्राथमिकता राहिली आहे. एमएसएमई मंत्रालय लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यासाठी आणि भारतातील वेगवान व्यावसायिक वातावरणात एमएसएमईंना मदत करणार आहे.” एमएसएमई असोत किंवा अन्न प्रक्रिया क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने मोठे उद्योग असोत. सूक्ष्म उद्योजक TMMM योजना, MSME साठी प्रधानमंत्री किसान संपदा योजना आणि प्रमुख व्यवसायांसाठी उत्पादन लिंक प्रोत्साहन योजना यासारख्या कार्यक्रमांसह, भारत जगातील अन्न पुरवठ्याचे केंद्र बनले आहे. आपल्याकडे मुबलक कच्चा माल आणि अविकसित प्रक्रिया क्षमता उपलब्ध असल्याने जागतिक स्तरावर अन्न प्रक्रिया आणि निर्यातीसाठी भारताकडे जाण्याचे ठिकाण म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांना पाहण्याची भरपूर संधी आहे, असे डॉ. जितेंद्र डोंगरे म्हणाले.
भारतात सारख्या खंडप्रायदेशात प्रक्रिया उद्योगाला मोठे मार्केट असल्यामुळे जगाचे लक्ष या ठिकाणी केंद्रित झालं आहे. प्रत्येक राज्याची भूक आणि चव वेगळी आहे.
एवढा मोठा उद्योग आणि उलाढाल असतानाही भारतात कृषि मालावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण हे 2 ते 3 टक्के आहे. तर तेच प्रमाण विकसित राष्ट्रांमध्ये 40 टक्के आहे. शेतमाल प्रक्रिया ही महत्त्वाची बाजार सेवा आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेमध्ये कच्चा माल विक्रीसाठी नेण्यापेक्षा मालावर प्रक्रिया करुन माल विकल्यास चांगली किंमत (दर) मिळते. त्या दृष्टीकोनातून भारतातील शेतमाल प्रक्रिया उद्योगांना शासनामार्फत अनुदान (सबसीडी) देऊन कृषि उद्योगांना मोठी चालना देण्यात येत आहे. याच अनुषंगाने शेतमाल प्रक्रिया उद्योगात वाढ व्हावी, शेतीचे उत्पादन दुप्पट होईल, कामगारांना रोजगार उपलब्ध होईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल त्यातून शेतकऱ्यांना आशादायी दिलासा मिळेल.