Home > मॅक्स ब्लॉग्ज > किती पिढ्या बरबाद करणार? विकास गोडगे

किती पिढ्या बरबाद करणार? विकास गोडगे

एका बाजुला आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जग विकास कवेत घेत असताना भारत पुढच्या पिढीला तरी त्या जगासाठी तयार करत आहे का? कि आपण अजुनही भोंगा, गाय, बैल, शाकाहार, मांसाहार, यातंच पिढ्यान पिढ्या बरबाद करनार आहोत याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचं परखड मत लेखक विकास गोडगे यांनी मांडलं आहे.

किती पिढ्या बरबाद करणार? विकास गोडगे
X

एलान मस्क स्पेस टेक्नॉलॉजी वर लाखो करोड खर्च करतोय, चीन पण स्पेस टेक्नॉलॉजी वर लाखो करोड खर्च करतोय. यातुन हे लोक काय एचीव्ह करनार आहेत असा प्रश्न आपल्या समाजवादी बांधवांना पडु शकतो किंबहुना उद्या भारताने असा खर्च स्पेस टेक्नॉलॉजी, रॉकेट सायन्स वगैरे वर करायला चालु केला तर मला पण पडु शकतो. कारण अर्थातच, भारतात करोडो लोक भयानक गरीबीत जगत असताना, एवढा खर्च अशा निरुपयोगी गोष्टीवर कशाला, असं साधं लॉजीक असतं.

ही झाली एक बाजू, अशा अनेक आघाड्यांवर संशोधन ईतक्या एडवांस लेव्हलला गेलेलं आहे कि उद्या त्या एलान मस्कचीच कंपनी एखाद्याच्या मेंदूतील संपुर्ण डेटा काढुन दुसऱ्या मेंदूत घालु शकतील. अमरत्व आजून काय असतं?

5 G तंत्रज्ञान सर्वसामान्य झाल्यानंतर आपल्याला त्याचं पोटेन्शियल समजेल तोपर्यंत मेटावर्स मधे मार्क झुकरबर्ग ने केलेली गुंतवणूक परतावा द्यायला चालु केलेली असेल. मेटावर्स, ब्लॉकचेन, IoT, बायोटेक्नॉलॉजी एडवांस्ड हेल्थकेअर ह्या गोष्टी ईतक्या पुढे गेलेल्या असतील कि जगाचे दोन सरळ सरळ विभाग पडलेले असतीलंच.

म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, न्युरोसायंस, स्पेस सायन्स यांचा डायरेक्ट उपभोग घेनारा समाज आणि उरलेला मेटावर्स मधे रमनारा समाज. मेटावर्स मधे रमनारा जगातीक समाज असेल, त्यात भारतातले काही लोक "सनातन राष्ट्र" निर्माण करुन आपली सनातनी राष्ट्राची भुक भागवू शकतात, ईथल्या कार्यकर्त्यांना मेटावर्सच्या सनातानी राष्ट्रात रमवून स्वःता , स्पेस सायंस, न्युरो सायंस, बायोटेक्नॉलॉजी, ने निर्माण केलेल्या अँडवान्स जगात जाऊ शकतात.

मग ते अँडवान्स जग ईथं पृथ्वीवर पण असु शकतं किंवा इंग्रजी चित्रपटातल्या प्रमाणे अवकाशात पण असु शकते. जगातील भांडवलशहा लाखो करोड रुपये अशा गोष्टींवर उगीच खर्च करनार नाहीत. नेटफ्लिक्सवर एक सिरीज बघत आहे. ,"Brave New World" हे लोक माझ्यासारखा विचार करतात कि मी त्यांच्यासारखा विचार करतो माहीत नाही.

पण त्यामध्ये दोन जग दाखविले आहेत. एक एडवांस्ड जग, ज्या जगात रोग नाहीत, मृत्युची भिती तशी नाही जशी आता आहे, सगळे सेम आणि दुसर्याच ग्रहावर राहतात. विकसित जगात राहतात. आणि दुसरं एक जग आहे, तिथं ते लोक रॉकेट मधे बसुन प्राणीसंग्रहालय बघायला गेल्या सारखं जातात. ते जग आपलं आहे, कार, लग्नसंस्था, गोळीबार, दारू, गरीबी, आणि तिथं जाऊन ते जग बघुन विकसित जगातले लोक आश्चर्यचकित वगैरे होतात. ते गरीब जग म्हणजे आपलं जग असतं त्याला ते सॅवेजेस म्हणत असतात किंवा प्रिमिटीव्ह म्हणजे स्टोन एज मधलं जग समजत असतात.

कल्पनाशक्तीचा भाग सोडला तरी मला ते जग किंवा आपल्या जगाची अशी दोन विभागात वाटनी खुप दुर आहे असं वाटत नाही. बहुसंख्य लोकांच्या रोजच्या भाकरीचे प्रश्न निर्माण करुन त्यांना रेशनच्या धान्यावर जगायची सवय लावने हे भारतातंच नाही तर संपूर्ण जगात चालू आहे. याचवेळी असा एक ईलिट वर्ग तयार होत आहे जो हृया टेक्नॉलॉजीकल आडवांसमेंटचा खरा लाभधारक असेल.

दोन वेगवेगळी जगं किंवा दुनिया निर्माण व्हायला मला वाटतं फक्त दहा वर्षाचा वेळ आहे. तेंव्हा मेटावर्स मधे कुणाला पाहिजे असेल तर इस्लामिक राष्ट्र निर्माण करा, कुणाला पाहिजे असेल तर सनातनी राष्ट्र निर्माण करा, कुणी येशुचं निर्माण करा, तुम्हाला तिथं रमायला सांगनारे रॉकेट मधून दुसऱ्या जगात जात असतील, अमरत्व सुद्धा मिळवलेले असेल, नुसतं शरीर बदलायचं आणि जून्या शरीरातल्या आठवणी त्यात टाकायच्या.

आपण त्या जगासाठी तयार आहोत का, आपल्या पुढच्या पिढीला तरी त्या जगासाठी तयार करत आहोत का, कि आपण आजुन भोंगा, गाय, बैल, शाकाहार, मांसाहार, यातंच पिढ्यान पिढ्या बरबाद करनार आहोत याचा विचार करा.

विकास गोडगे

Updated : 18 April 2022 1:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top