संघाचा स्वयंसेवक सत्तेत कुठे आहे ? -डॉ. बाळासाहेब पवार
संघ कार्यकर्ता (RSS) आणि प्रचारक जीवाच रान करून भाजपाला (BJP) सत्तेत आणतो पण या सत्तेत प्रचारक कुठे आहे हा प्रश्न पडतो . तो प्रचार कार्याला वाहून घेतो त्यामुळे भेटकंती आली त्याचा शिक्षणावर परिणाम होतो . सत्ता मिळाली किंवा मिळवून दिली तर कायम स्वरूपी प्रशासकीय पद मिळत नाही . कोणाचा तरी स्वीय सहाय्यक किंवा एखाद्या आमदार, खासदार यांच्यावर लक्ष ठेवणे या पेक्षा दुसरे काम मिळत नाही . पद मिळाले तर आर्थिक फायदा काहीही नाही . हा संघाचा म्हणून तो राजकारणी सावध राहतो याला काही मिळत नाही . उलट तिरस्कार वाट्याला येतो जर नेता संघाचा असेल तेही क्वचित तर थोड बरे दिवस नसता पिशवीत संसार सुरूच राहतो.. वाचा समाजिक व राजकीय विषयांचे अभ्यासक डॉ. बाळासाहेब पवार यांचा परखड लेख...
X
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रस) या भरतातील संस्कृतिक संघटने बद्दल खा. राहुल गांधी यांनी इंग्लड मध्ये जाऊन फारच भयंकर भाष्य केले . रा.स्व.स. ची तुलना त्यांनी मुस्लिम ब्रदरहूड या दहशतवादी संघटनेशी केली . हे जरा जास्तच झाले . तसा संघाचा स्वयं सेवक मी स्वतः संघाचा स्वयंसेवक आहे असे धाडसाने जाहीरपणे सांगत नाही . तो जाहीर सभा किंवा मेळावे घेत नाही , शाखा पण केव्हा कुठे भरतात समजत नाही . दसऱ्याला काठी घेऊन ठराविक भागात ठराविक लोक परेड करतात व नंतर गायब होतात. मध्यतरी कुठे दिसत नाहीत . वयस्कर सेवा निवृत्त स्वयंसेवक मात्र देशाची काळजी करताना शहरात वर्तमान पत्र वाचताना चर्चा करताना दिसतात . मग संघ थेट मुस्लिम ब्रदरहूड या खतरनाक संघटने सारखा कसा काय असा प्रश्न पडणे साहजिक आहे . एक मुद्दा फक्त जुळण्यासारखा आहे . तो म्हणजे मुस्लिम ब्रदर हूड ज्या पद्धतीने ख्रिस्ती जगाची भीती मुसलमानांना दाखवते तसेच संघाचा स्वयंसेवक हिंदुना मुसलमानांची सतत भीती दाखवत राहतो पण तो थेट जाहीर सभा घेत नाही . ऐक एकट्याला गाठून त्याचा अंदाज घेत तो त्याला ही चर्चा सुरु करून पाठपुरावा करत त्याला आपल्याशी जोडून घेतो . जर समोरचा अंदाजात नसेल तर तो त्याला फार वेळ वाया घालवत नाही . फक्त अडचण ही आहे की त्याला समस्त हिंदू ही भावना रुजवताना जाती व्यवस्था आडवी येते . तो अंदाज घेता घेता खुप वेळ जातो . जेव्हा अंदाज येतो तेव्हाच तो त्याच हिंदुत्वाच कार्ड बाहेर काढतो . आणखी एक मोठी अडचण असते जरी आज संघ शंभर वर्षचा होत असला तरी आपला मुद्दा जाहीर पणे पटवून द्यावा इतकी सामुग्री स्वयंसेवका कडे निश्चित नसते . त्यामुळे तो लहान मुलांना किंवा फार तर पौगंड अवस्थेतील मुलांना आपला स्रोता बनवतो . यात मात्र ते यशस्वी झालेले दिसतात . शाखेत तयार केलेली पोर व त्यांना एक गोस्ट जी शिकवली जाते ती म्हणजे प्रश्न विचारायचा नाही . शंका घ्यायची नाही . आपण व आपला धर्म व आपला अखंड भारत हे सर्व मी सांगतो त्यात समावलेले आहे . चर्चा करायची नाही फक्त ऐकायचं . मी पण प्रचारका चे ऐकतो व त्यांना काही विचारत नाही . तुम्ही काही विचारायचं नाही , असा हा एकूण व्यवहार असतो . त्यासाठी ही मुले आपले आयुष्य पणाला लावतात.
भारत हिंदुराष्ट्र व्हावे ही एक जबरदस्त मानसिकता तयार केलेली असते . मुद्दे फार नसतात ,त्यामुळे चर्चा फार नसते . प्रभू रामाचे मंदिर , हिंदू राष्ट्र , अखंड हिंदुराष्ट्र ,मुस्लिमांची वाढती संख्या या पलीकडे मुद्दा नाही . व या मुद्द्याचे समर्थन करावे असा युक्तिवाद पण नाही . सर्व काही अर्धवट .ना प्रश्न पूर्ण ना उत्तर समाधान कारक या घालमेलीत स्वतः च्या आयुष्याचा कसलाच विचार नाही . स्वतः ची कल्पना किंवा प्रश्न विचारण्याची ,शंका घेण्याची शक्ती पूर्ण संपवल्या मुळे फक्त हिंदू शब्द पुरेसा असतो . आपल्या आयुष्याचा काहीही विचार न करता कोणताही कार्यक्रम पार पाडणे व मोठा आनंद व तेज मिरवणे कार्यक्रम सुरु असतो. यात या स्वयसेवकाचं आयुष्य कुठे हरवून जात ?
तारुण्य सुलभ भावना या फार अवजड अश्या राष्ट्र या संकल्पनेशी बांधून ठेवलेल्या असतात . जगणं म्हणजे संघ आणी फक्त संघ बस्स. एक मात्र खरे की त्याला पुरेशे कपडे व जेवण मात्र कोणाच्या तरी घरी उपलब्ध करून दिले जाते . त्याला ऐकणारा अज्ञानी लहान वर्ग उपलब्ध असतो . त्याला आपल्याकडे असलेले ज्ञान देण्यात मोठी धन्यता मानत हे लोक जगत असतात . शत्रूभावी राष्ट्रवाद ऋजवन सोप असत त्याला फार अक्कल लागत नाही . त्याला माना डोलावणं पण सोप असते . व त्याचा आनंद काही और असतो तो या कामात सतत मिळतो . प्रेम , लग्न या भावने पासून तो दूर राहावा याची काळजी घेतली जाते . इतकेच नाही तर स्वतः च्या कुटुंबाच्या संपर्कात आल्यास तो संघाच्या बाहेर पडू शकतो म्हणून त्याला दूर प्रचारक म्हणून पाठवले जाते . ही त्याची पहिली पदवी असते . जीवाचे रान करत अतिशय कमी गरजेत कफल्लक आयुष्य लाखो प्रचारकाच्या वाट्याला येते . तो नावाने संघाचा पण खऱ्या अर्थाने भाजपा चा कार्यकर्ता असतो . अलीकडे निवडणुकीच्या सर्व जबबदाऱ्या या संघाच्या कार्यकर्त्यावर सोपवल्या जातात. तो कसली ही अपेक्षा न करता त्या उमेवाराची ओळख पाळख नसताना निवडणूक पार पाडतो . दिलेली जबबदारी पार पाडली की त्याला दुसरी कडे पाठवले जाते . त्याचे स्वतः चे असे राजकीय अस्तित्व किंवा त्याचा मतदारसघ तयार होणार नाही . किंवा त्याला सत्तेचा मोह होणार नाही याची काळजी घेतली जाते . यात लहान प्रचारक तर सोडा खूप मोठी माणस पण सहजा सहजी राजकीय पटला वरून गायब केली जातात . एक काळी गोविंदाचार्य , राम माधव या माणसांचा दबदबा होता . ईशान्य भारत व कश्मीर सारख्य कसलेच काम नाही अशा ठिकाणी यांनी भाजपा चा प्रचार केला . आता यांना परत माघरी पाठवण्यात आले आहे . महाराष्ट्रात शरद कुलकर्णी या अतिशय जाणत्या माणसाला कधी सत्तेत येऊ दिले नाही . नाशिकच्या सरकारी दवाखान्यात बेड नसलेल्या पालंगा वर त्यांनी अखेरचा श्वास घेतला ती बातमी आज ही आठवते . असे प्रचारक ते प्रेस समोर किंवा प्रचारात समोर येऊन बोलू शकत नाहीत . बंड करणे तर रक्तात नाही .कायम तडजोड हे आयुष्य असते. त्यांना दोन तीन पद राखीव असतात . महामंत्री , संघटन सचिव, कार्यालय प्रमुख या पेक्षा वेगळं पद संघाच्या माणसाला भाजपात कधीच दिल जात नाही .ते ही फार अल्प काळ दिले जाते . या पेक्षा भयंकर म्हणजे त्यांना स्वतः ची ओळख लपवावी लागते . पूर्ण नाव किंवा गावाचा पत्ता कधीच उघड केला जात नाही . व्ही. सतीश, बी . संतोष. एन. माधव अशी नावे दिली जातात . यापेक्षा विचित्र म्हणजे प्रचारकाची नावे पण बदलली जातात . ज्या भागात काम करायची जबाबदारी आहे . त्या भागातील प्रबल जातीचे आडनाव त्याला वापरावे लागते , महाराष्ट्रात पाटील नावाचे प्रचारक भेटतात . गुजरात मध्ये पटेल असे आडनाव वापरले जाते . हे सर्व का केले जाते हे समजत नाही अलीकडे समाज माध्यमात सुद्धा तो फार व्यक्त होत नाही . फेक खात्यावरून तो ट्रोल आर्मीत सहभागी होतो त्यातही अंगलट येईल असे काही करत नाही . तसे धाडस दाखवत नाही . फक्त मोदी याशिवाय काही लिहित नाही . तो त्याच्या मातृ संघाच्या नेत्यांचा जय जयकार करू शकत नाही . स्वतः बरोबर आपल्या संघाच्या कोणाशी आपले सबधं आहेत हे पण उघड करत नाही . त्यामुळे या संघटने बद्दल अनेक शंका निर्माण होतात .रस्त्यावर न दिसणारी जाहिरपणे कार्यक्रम न घेणारी संघटना काही तरी विषारी प्रचारात गुंतलेली असते अशी भावना सतत होते . ही जिचे समस्त हिंदू च्या हिता बद्दल काय धोरण आहे हेच अद्याप स्पष्ट नाही . फक्त तेच मुद्दे हे पूर्ण होत नाहीत त्याची आयुष्यभर चर्चा यात प्रचारक व कार्यकर्त्याचे आयुष्य कुठे आहे ?
संघ कार्यकर्ता व प्रचारक जीवाच रान करून भाजपा ला सत्तेत आणतो पण या सत्तेत प्रचारक कुठे आहे हा प्रश्न पडतो . तो प्रचार कार्याला वाहून घेतो त्यामुळे भेटकंती आली त्याचा शिक्षणावर परिणाम होतो . सत्ता मिळाली किंवा मिळवून दिली तर कायम स्वरूपी प्रशासकीय पद मिळत नाही . कोणाचा तरी स्वीय सहाय्यक किंवा एखाद्या आमदार, खासदार यांच्यावर लक्ष ठेवणे या पेक्षा दुसरे काम मिळत नाही . पद मिळाले तर आर्थिक फायदा काहीही नाही . हा संघाचा म्हणून तो राजकारणी सावध राहतो याला काही मिळत नाही . उलट तिरस्कार वाट्याला येतो जर नेता संघाचा असेल तेही क्वचित तर थोड बरे दिवस नसता पिशवीत संसार सुरूच राहतो .
प्रचारक शक्यतो ब्राम्हण असल्याचे दिसते त्यामुळे थेट निवडणूक रिंगणात उतरण्याचे प्रमाण फारच कमी असते . ज्यांना सत्ता मिळते ते बाहेरून आलेले आयाराम गयाराम असतात . निवडणुका पैश्यावर लढावल्या जातात विचारावर नाही . मग हा प्रचारक कसा लढणार . आणी जेव्हा काही ठिकाणी नियुक्ती ची वेळ येते मग विधान परिषद , महामंडळ तेव्हा संघाला देणगी देणारा आर्थिक मदत करणारचे नाव पुढे येते . एक नावा पुरता प्रचारक अशा ठिकाणी नेमतात . त्याला मान मिळतो बाकी काही नाही . याला ना बायको ना कुटुंब हा पैश्या पासून दूरच राहतो . नंतर कधी तिथून् काढून दुसरी कडे पाठवतील सांगता येणार नाही . परंतु अगदी शाखा लावणारा सर्वोचं पद मिळवण्याची उदाहरणे बोटावर मोजण्या इतकी आहेत . राजकारण हा भयंकर खेळ असतो. फक्त गुपचूप प्रचार करण्याची गोस्ट नसते त्याला धाडस लागते . स्वतः च कुटुंब पाठीशी लागते जात पाठीशी लागते. या सगळ्याच्या दूर ठेवलेला प्रचारक सत्तेत कसा सापडणार . त्याला पक्षात येणाऱ्या बाहेरच्या नेत्यांच्या सतरंज्या उचलण्या शिवाय पर्याय नसतो . तो नेता कधी पक्ष सोडून जाईल याचा नेम नसतो . नेत्यांना असे प्रामाणिक लोक नको असतात त्यामुळे याला कधीच सत्तेत वाटा मिळत नाही . स्थानिक पातळीवर एखादा प्रचारक कुटुंबात स्थिरवला तर त्याला फार तर मरे पर्यंत मंडळ प्रमुख करून टाकतात नाही तर पन्ना प्रमुख करून टाकतात् आहे त्या भागात तिच ती केसेट वाजवत राहावी लागते . झाला चुकून तर नगरसेवक त्याच्या पुढे काही नाही. हे सगळं चित्र पाहिलं तर तो प्रत्येक सभा कार्यक्रमाला स्वतः ची जबबदारी म्हणून हजर असतोच असतो . कधी सभेत वक्ता म्हणून बोलायला मिळत नाही . नेत्याचे कार्यकर्ते याला कधीच माईक पर्यंत जाऊ देत नाही . तसे पण त्याने जाहीर बोलावे असे त्याच्या कडे काही नसते पण मान पण मिळत नाही हे वास्तव आहे . अनेक प्रचारकाचे आयुष्य कसे संपते हे पण कळत नाही . पण आयुष्यभराचा पिळ मात्र निघत नाही. शहराच्या अनेक कोपऱ्यावर मंदिरा; जवळ वयस्क मंडळी बसलेली असतात . त्यातील बरीच नोकरीतून सेवानिवृत्त असतात पण फार मोठी नाही लहान सहान बँक किंवा आयुर्विमा कंपनी तुन निवृत्त झालेली . पण तिथे ही ते प्रचारच करतात . तिच चर्चा जी लहानपणी कोणी तरी प्रचारकांनी डोक्यात घातलेली आयुष्य भर धर्माची काळजी तर मुस्लिमांची भीती . कोणत्याही प्रश्नाचं आयुष्य भर उत्तर न मिळालेली ही मंडळी अशीच सत्तेविना आयुष्य जगतात . ज्या संघाला वाहून घेतलं तो काही देत नाही . . तिथे काही मिळणार नाही अशी व्यवस्था केलेली तर काही मिळवायचं नाही अशी मानसिकता याची झालेली या मनस्थितीत् जगत राहतो . फायदा मिळेल अशी संधी मिळाली तर संघ अडवा येतो . संघाच लक्ष असतेच पण संघाचा म्हणून कोणी विश्वास ठेवत नाही . ही भयंकर परिस्थिती वाट्याला येते अतिशय श्रीमंत . मजेत जगणारा एखादा प्रचारक सापडला तर फार मोठा आनंद होईल . परंतु ब्राम्हण परिवारातील असा खरा प्रचारक सापडू शकत नाही . संघाचा आधार घेत सत्तेचा फायदा घेणारे आता ब्राम्हणेतर जास्त आहेत. ही वाढती संख्या पण त्याला त्रास दायक आहे . संघ जास्त विस्तारेल तेव्हा ब्राम्हण प्रचारक संघात अल्पसंख्य होण्याची भीती त्याला ग्रासते आहे . आता कोणत्याही बाबी ला पैसा लागतो त्यामुळे पैसे वाले पण संघात आता वाढत आहेत . ते फक्त जवळ आहेत संघात नाहीत .. जे सत्तेत आले मोठे झाले ते थेट संघाचे नसतात तर संघाच्या कोणा तरी जवळचे असतात . संघ कार्यकर्ता व प्रचारक मात्र असाच आयुष्यभर अखंड हिंदू राष्ट्र उराशी बाळगत जगत राहतो सत्तेत कधीच कुठेच दिसत नाही.
Tags;