जातपंचायती,बालविवाह कायद्याची अंमलबजावणी कधी करणार? - दुर्गा गुडिलू
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 May 2021 10:00 AM IST
X
X
राज्यात करोना महामारीने हाहाःकार माजवला आहे. या करोना महामारीतील दुसरा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. या दिनानिमित्त महाराष्ट्रात विकासाच्या बाहेर असलेला समाज प्रथा परंपरांच्या जाळ्यात अडकला आहे. जातपंचायती, बालविवाह आजही या पुरोगामी महाराष्ट्रात सुरु आहे. यासंदर्भात आम्ही सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा गुडिलू यांच्याशी बातचीत केली.
त्या सांगतात की, राज्यात होणाऱ्या जातपंचायती,बालविवाह यांना रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या कायद्यांची कडक अंमलबजावनी करणे गरजेचं आहे. तसेच भटक्या विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणासाठी जातीचे दाखले महत्त्वाचे आहेत कारण आर्थिकदृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांना शिक्षण घेणं शक्य नाही. त्यामुळे सरकारने लवकरातलवकर त्यांना महत्त्वाची कागदपत्रे मिळवून द्यावी. असं दुर्गा गुडिलू यांनी म्हटलं आहे.
Updated : 1 May 2021 10:00 AM IST
Tags: Maharashtra Day जयमहाराष्ट्र 1May
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire