Home > मॅक्स ब्लॉग्ज > व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकची क्रांती मराठीला धोकादायक ठरतेय का?

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकची क्रांती मराठीला धोकादायक ठरतेय का?

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकची क्रांती मराठीला धोकादायक ठरतेय का? तंत्रज्ञान, सोशल मीडियाची क्रांती मराठी भाषेला धोकादायक ठरतेय का? तंत्रज्ञान, वाणिज्य आणि विज्ञानातील भाषा मराठीत कशी आणता येईल? तसेच या तंत्रज्ञानाच्या क्रांती सोबत मराठी भाषा कशी जपली पाहिजे ? यावर प्रा. नितीन आरेकर यांनी गेल्यावर्षी मराठी भाषा दिनाला हे चिंतन मांडले होते, मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी हे चिंतन पुन्हा....

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकची क्रांती मराठीला धोकादायक ठरतेय का?
X

आरेकर सांगतात की, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरुन एकमेंकांशी मॅसेजद्वारे संवाद साधताना तुम्ही इंग्रजी शब्द आणि मराठी भाषेचा किंवा शॉर्ट फॉर्म सारख्या भाषेचा वापर करत असतात इथे मला धोका जाणवतो.. कारण मोबाईलच्या किबोर्डवर असलेल्या रोमण लिपीतून तुम्ही मराठी भाषेत संवाद साधतात. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या युगात रोमन लिपीपासून देवनागरी लिपीला धोका आहे.

मोबाईलच्या परिभाषेत सांगायचं झालं तर इमोजीची जी भाषा आजची पिढी आपले भाव दाखवण्यासाठी वापरत असतील तर ते काळजी करण्यासारखचं आहे. कारण या भाषेमुळे मराठी भाषेचं काय होणार? तसेच देवनागरी लिपी आणि व्याकरण बाजूला ठेऊन जर ही भाषा अशीच सुरु राहिली तर भविष्यात या भाषेचं स्वरुप नेमकं कसं असणार आहे? याचा वेध घेणं हे आपल्या सर्वांसाठी आव्हानास्पद आहे.

तंत्रज्ञान, वाणिज्य आणि विज्ञानातील भाषा मराठीत कशी आणता येईल? तसेच या तंत्रज्ञानाच्या क्रांती सोबत मराठी भाषा कशी जपली पाहिजे ? याचं प्रा. नितीन आरेकर यांनी केलेलं विश्लेषण नक्की... पाहा हा व्हिडिओ...

Updated : 27 Feb 2022 7:10 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top