Home > मॅक्स ब्लॉग्ज > अफगाणिस्तानच्या पोटात गूळ आहे…

अफगाणिस्तानच्या पोटात गूळ आहे…

रशिया, अमेरिका, चीन, ब्रिटन, सतत छोट्या देशांच्या मदतीचा आव आणत असतात. मात्र, या मदतीच्या मागे त्यांचा नक्की उद्देश काय आहे? ज्या देशांना हे देश मदत करतात त्या देशांच्या नागरिकांच्या हातात बंदुका कुठून येतात? त्या देशात टोळी युद्ध का वाढते? वाचा संजीव चांदोरकर यांचा लेख

अफगाणिस्तानच्या पोटात गूळ आहे…
X

खूप सारे मुंगळे दिसले तर आजूबाजूला गूळ आहे समजावे. गेली काही दशके अफगाणिस्तानला जगातील महासत्ता सोडत नाहीयेत; रशिया, अमेरिका, चीन, ब्रिटन, सतत अफगाणिस्तान विषयी चर्चा; दाखवतात असे की त्यांना तेथील लोकशाहीची चाड आहे तेथील स्त्रियांची काळजी आहे. पण खरे कारण आहे; अफगाणिस्तानच्या पोटात गूळ आहे.

खनिजे आहेत:

तांबे, लोह, त्याशिवाय अभावाने आढळणारी लिथियम, उयरेनियम देखील आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक तेल आणि वायू आफ्रिकेत ढेर सारे देश आहेत; तेथे देखील हातात बंदुका आणि अमेरिकन बनावटीच्या जीप्स वगैरे घेऊन तेथील टोळ्या एकमेकांवर कुरघोडी करत असतात; सतत सत्तापालट होत असतो. कधी ऐकलंय रशिया, अमेरिका, चीन जोरजोरात तेथील लोकशाही, स्त्रियांच्या भवितव्याबद्दल चर्चा करतांना ?

कारण का? कारण तेथे गूळ नाहीये

अफगाणिस्तान बाबतीत विसवर्षापूर्वी आणि आताच्या परिस्थिती एक महत्वाचा फरक आहे : मधल्या काळात चीनचा महासत्ता म्हणून झालेला उदय चीनच्या ऐन जवानीत असणाऱ्या राजकीय, आर्थिक, लष्करी महत्वाकांक्षा; पोकळ नाहीत तर मस्क्युलर चीनचा ६५ राष्ट्रांना विळखा घालणारा बेल्ट अँड रोड प्रकल्प; जो त्याला युरोपपर्यंत न्यायचा आहे; त्यात अफगाणिस्तान महत्वाचा दुवा होऊ शकतो. एकेकाळी ब्रिटिश इंडियाचा भाग असलेला, भाषा, सांस्कृतिक, खाणे पिणे बाबतीत आपल्याशी जवळ असलेला अफगाणिस्तान: या साऱ्या गदारोळात भारत कोठे आहे?

संजीव चांदोरकर

Updated : 21 Aug 2021 12:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top