Home > मॅक्स ब्लॉग्ज > "क्या से क्या हो गया हमारे वर्ल्ड कप के मैदान में"

"क्या से क्या हो गया हमारे वर्ल्ड कप के मैदान में"

क्या से क्या हो गया हमारे वर्ल्ड कप के मैदान में
X

नियंत्रकाची व्याख्या मंडळ कधी देऊ शकेल का ? "क्या से क्या हो गया हमारे वर्ल्ड कप के मैदान में" सध्या या गाण्याचे गुंजन कानी ऐकू येत आहे. तसे कारणही खास आहे. दी बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया अर्थातच आपल्या देशाच्या क्रिकेट खेळाच्या नियंत्रणाची जबाबदारी घेतलेली एक स्वतंत्र खाजगी संस्था ज्यात सध्या पुढारी राजकारणी नेत्यांचे कवच आश्रय वरदहस्त यांचे वलय आढळते. या बीसीसीआय मधील कंट्रोल अर्थातच नियंत्रण शब्दाचा अर्थ स्थापना झाल्यापासून आजपर्यंत झालेले अध्यक्ष कार्यालयीन कामकाजात तरबेज असलेले सदस्य आजी माजी खेळाडू, पंच जाणकार यांना न व्हावा हे एक आश्चर्यच आहे. किमान संशोधन होऊन समाधान होईल असे उत्तर आमच्या तरुण पिढीस अपेक्षित आहे.

आमचा २०२३ मधील विश्वचषकाचा दर्जा त्यास शोभावा असा नाही असे सर्वत्र चर्चिले जात आहे. पाकिस्तान संघाचे डायरेक्टर मिकी ऑर्थर यांनी या वाक्याचा पुनरुच्चार प्रथम केला. आमची माती आमची माणसं यांची खेळपट्टी विषयी किलबिल सुरू झाली. यावर भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने या खेळपट्टीवर किमान ३५० धावसंख्या उभारली जाते तीच खेळपट्टी चांगली असे सरसकट प्रमाण आयसीसीसीने लावू नये असे त्यांचे स्वतःचे मत प्रदर्शित केले. यावर अनेकांचे समाधान झाले नाही. किंबहुना आयसीसीच्या सदस्यांचे व त्यांची अहमदाबाद व चेन्नई या खेळपट्ट्यांना सरासरीचा दर्जा दिला व अन्य खेळापट्ट्याना चांगले व खूप चांगले असे शेरे बहाल केले.

प्रत्येक सामन्याच्या वेळी आयसीसी नियुक्त सामनाधिकारी मैदान (आऊट फिल्ड ) व खेळपट्टीबद्दल शेरा देतात. ज्या मैदानावर इंग्लंडचा कर्णधार बटलरने टीका केली होती. त्याला समानधिकारी श्रीनाथने सरासरीचा दर्जा दिला होता. जानेवारीत झालेल्या T20 लढतीत लखनऊच्या मैदानास व खेळपट्टीस लक्ष्य करण्यात आले होते.आज त्यांना खूप चांगले असा शेरा देण्यात आला आहे. आपणास आदरातिथ्य पूर्वक शहाणे, दीड शहाणे व अतिशहाणे यांच्या गाठीभेटी होतच असतात..आयसीसीला असे हेतुपुरस्सर कृती करण्याबद्दल कोणती श्रेणी बहाल करावी..?

बटलरनंतर अफगाणचे प्रशिक्षक जोनाथन टॉट यांनीही आऊटफिट बद्दल तीच चिंता उपस्थित केली. बांगलादेशाचा खेळाडू रहमान हा स्लिप होऊन पडल्याने दुखावला होता. सूर मारून चेंडू पकडणे, झेल घेणे वाटते तेवढे सोपे नव्हे असे अनेक संघातील खेळाडूंचे या मैदानाबद्दल मत झाले आहे. आयपीएल सामन्याच्या वेळेस आज आहे ती परिस्थिती नक्कीच नव्हती. हे सांगण्यासही खेळाडू विसरले नाहीत.

बांगलादेशाच्या रंगना हेप्थ या प्रशिक्षकाने आम्ही परिस्थितीशी जुळवून घेतले असे तक्रार न करता कथित केले आहे. खेळाडू शंभर टक्के योगदान देऊ शकणार नाही असे त्याने स्पष्ट ठासून सांगितले.

भारतीय संघातील खेळाडूंना धर्मशाला (हिमाचल प्रदेश) या मैदानाची तसेच खेळपट्टीची चांगली माहिती होती.खराब मैदानामुळे झेल घेण्यासाठी झेपावणे,शक्यतो टाळून दुखापतीपासून लांब राहावे अशा सूचना संघ व्यवस्थापणाने सुरुवातीलाच दिल्या होत्या. आम्हीच तर सत्यतेची प्रचिती दिली.दोषींना अप्रत्यक्ष दोषींच ठरविले ही केवळ पूर्वकल्पना होती. रोहित शर्मा स्लाईड झाला तेंव्हा त्याच्या बोटास दुखापत झाली होती. व उपचारासाठी मैदानही सोडावे लागले. बुमराह थोडक्यात वाचला हे अनुभव पुरेसे होते. बघणाऱ्यांनी बघितले व बातम्या केल्या. हे सर्व होत असताना भारतीय क्रिकेट खेळाचे नियंत्रक कुठे होते.? चौकशीअंती कळले की, सामान्यांना लोकांची गर्दी होत नाही, म्हणून दक्षिणेकडील रजनीकांत आणि आपल्याकडील बीग बी यांना विशेष आमंत्रित करून क्रिकेट खेळामुळे नव्हे, खेळाडूमुळे नव्हे तर नटांच्या उपस्थितीमुळे तरी लोक स्टेडियमपर्यंत येतील. झाले नाहीतर होणारही नाही ,नियंत्रकांनी त्यांचा भांगडा चालूच ठेवला. 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे'.


स्पर्धा आयोजनात एकंदरीत 10 देशांचा सहभाग आहे. त्यानुसारच स्टेडियम-मैदानाचा समतोल राखण्यात आला आहे.नियंत्रकाच्या विजयानुसार कमिट्या केलेल्या असतात व तेच ठिकाणांची निवड करीत असतात. देखभालीची व्यवस्था संबंधित संघटना असोसिएशन यांच्यावर सोपवण्यात आलेली असते. संघटनेतील पदाधिकारी एकत्रित येऊन त्या पार पाडतात.व कार्यक्रम यशस्वी करतात. 2023 ची विश्वचषक स्पर्धा ही आपल्याकडील आयपीएल स्पर्धेची झेरॉक्स आहे.. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. काही संघातील खेळाडू सोडले तर इतरांना आपल्या मैदानाची कल्पना आहे. अनेकांची त्यांची सामन्यातील कामगिरीच साथ देते. आज खेळपट्ट्या तयार करताना त्या प्रांतातील उपलब्ध मातीचा वापर करून तयार केल्या जातात. म्हणून खेळपट्टीचा रंगही तसाच असतो.अनेक ठिकाणी आज काळी मातीही मिश्रित केली जाते.म्हणून रंगही वेगळा दिसतो.व खेळताना ती आपले खरे रूप दाखवते. व त्याप्रमाणे सामन्यांचे निर्णय लागतात.हे सर्व कर्णधारास ओळखता आले पाहिजे. तरच अनुभवाने साध्य करता येते.

यजमानपद आपल्याकडे असल्याने आपण आपल्याला मददगार होईल अशी खेळपट्टी बनवू शकतो. तशी काम करणारी अनुभवी जाणकार मंडळी मागे आपल्या ताफ्यात हवी. आज खेळपट्टीवर भरपूर टोलिंग करून टणक स्वरूपाची पाटा खेळपट्टी सर्वत्रच बनविली जात आहे. जो पर्यंत फलंदाज स्वतः चूक करून बाद होणार नाही, त्याला बाद करणे गोलंदाजास शक्य नाही कारण गोलंदाजास खेळपट्टीची साथ मिळत नाही.

कुठलीही स्पर्धा ही फलंदाजास अनुकूल वातावरण उपलब्ध करून खेळविले जाते.सीमारेषेचे अंतर कमी केले आहे.यामुळे फलंदाजास चौकार-षटकार मारणे सुलभ झाले आहे. या स्पर्धेतील शतकांची संख्या पहा, स्पर्धेतील चौकार-षटकारांची संख्या पहा.सोबतच टीमची धावसंख्या 350 ते 400 पर्यंत मजल मारली जात आहे. एवढ्या धावांचे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील फलंदाजाकडून अशी धावसंख्येचा पाठलाग करून विजय प्राप्त करणे, हे आव्हानच असते. शक्य झाले तर विजय अन्यथा पराभव खेळाडू खेळतील मानसिक दबाव कशा रीतीने पेलवतात हा मुद्दा कळीचा ठरु शकतो.

आत्तापर्यंतच्या सर्व सामन्यात कोणत्याही संघाच्या कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजच्या बॅटला नुसता चेंडू स्पर्श होताच चेंडू सीमापार होतो, फलंदाजास चौकार प्राप्त होते एवढे आऊटफिट फास्ट आहे. त्यावर कदाचित रोड रोलिंग केलेले नसावे. नियंत्रकाचे नियंत्रण याचा अभाव या स्पर्धेत प्रामुख्याने जाणवला. नियंत्रकांना विश्व करंडकाच्या भल्या-बुऱ्याचा विचार नाही.परंतु एकत्रित येऊन गातात त्यात म्हणतात, रमैय्या वस्तावैय्या, रमैय्या वस्तावैय्या, मैने दिल वर्ल्डकप को दिया,मैने दिल वर्ल्डकप को दिया..


क्रिकेट एक्सपर्ट - अभय गोवेकर


Updated : 24 Nov 2023 11:35 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top