Home > मॅक्स ब्लॉग्ज > #Governorgoback महामहीम, उत्तराखंडच्या भूमिपुत्रांचे काय? नम्रता देसाई

#Governorgoback महामहीम, उत्तराखंडच्या भूमिपुत्रांचे काय? नम्रता देसाई

पोटापाण्याच्या निमित्ताने देशातील प्रत्येक राज्यात स्थलांतर झाले आहे. महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी गुजरात आणि राजस्थानच्या स्थलांतरितांचा गौरव करत मराठीला दुय्यम लेखले.. परंतु मागास उत्तराखंड राज्यातून देशाच्या विविध ठिकाणी स्थलांतरित असलेल्या भूमिपुत्रांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचं निरीक्षण पर्यटन व्यवसायिक नम्रता देसाई यांनी नोंदवला आहे.

#Governorgoback महामहीम, उत्तराखंडच्या भूमिपुत्रांचे काय? नम्रता देसाई
X

उत्तराखंड मधून बाहेरच्या राज्यात जावे लागणारे लोक सध्या कोणत्या परिस्थितीत राहतात, कशा प्रकारच्या नोकऱ्या करतात, त्यांची कौटुंबिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न अशा गोष्टी संबंधित व्यक्ती कधीच करत नाही.

वायफळ शेरेबाजी करून लोकांना त्यात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं इतकंच काम आहे.

अनेक प्रकारचे घोटाळे, अपहार, भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार चालू आहे. त्याविषयी बोलायला विरोधक कमजोर आहे, हेच सत्य आहे.

कोणतंही लिखित माध्यम तितकं धारदार राहिलं नाही. हेतूपुरस्सर चटपटीत लिहू शकणारे लोक, आकर्षक मथळे, तितकीच बडबड ओळी खरडणारे लोक यांना कंपनी सुरू करायला सांगून वाटेल ते पसरवण्यात येतंय.





एखाद्या कंपनीच्या विश्वसनीयतेचा विषय, संबंधित व्यक्तींच्या संघटनात्मक विचारांची दिशा, कुटुंबाचे स्वहितार्थ निर्णय आणि माहिती दडवून मतप्रवाह तयार करण्याची पद्धत याच जोरावर हे लोक सत्ता उपभोगत आहेत.

त्याचाच पाठ गिरवत तसंच वागू बघणारे विरोधकही कमाल हास्यास्पद आहेत.

लोकांना मत प्रक्रियेत सहभागासाठीचे नियमही व्यक्ती बदलली की निराळे लागू होत आहेत.

दीर्घ काळ एका पक्षाची सत्ता असेल तर राष्ट्राच्या गुंतवणूकीत भर पडावी अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी बरं पडेल असं म्हणणारे राजकीय चाणक्य कुठे गायब झाले आहेत.

घडीघडी सत्तांतर आणि अधांतरी प्रशासन या गोष्टी देशात मोठ्या प्रमाणात अंधाधुंद माजायला कारण ठरू शकतात. पण त्याकडे लक्ष द्यायची इच्छा निवडणूक प्रक्रिया लढवू इच्छिणाऱ्या लोकांत शिल्लकच नाही असं दिसतंय.

एकूणच गदारोळात जगणारे स्वमग्न लोक सध्या पुढचा दिवस मोजत आहेत.

Updated : 31 July 2022 9:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top