Biporjoy cyclone | बिपरजॉय वादळाने उडवले पत्रकारितेचे छप्पर
X
बिपरजॉयने वादळ आणि त्या वादळाची करण्यात आलेली पत्रकारीता ही काही वृत्तवाहीने अतिशय वेगळ्या पध्दतीने केली. तो सध्या सोशल मीडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. असंख्य लोकांनी या वृत्तांकावर टीका केली आहे. यावर सविस्तर मुलाखत घेतली असता त्यावर माध्यमांशी निगडीत असणाऱ्यांनी यावर चर्चा केली आहे. "टीव्ही पत्रकारितेचा केंव्हाच मृत्यू झाला आहे. जेंव्हा मोठ मोठ्या वृतपत्र समुहानी काही वर्षांपूर्वी आपले हे ब्रीद वाक्य घेतले ते म्हणजे We are not in bussiness of Journalism, We are doing Info-Entertain Business. त्यामुळे सध्या पत्रकारिता सुरू नसून चॅनेलच्या मालकाला हव्या असणाऱ्या व्यक्तीचे महिमा मंडण आणि त्याच्या विरोधकांचे चारित्र्यहनन करणे," असे मतं माध्यम तज्ञ डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मांडले आहे. या चर्चेत आकाशवाणी आणि दूरदर्शन माजी डायरेक्टर चंद्रकांत बर्वे उपस्थित होते. माध्यमं आणि पत्रकारीता यातील होणारे बदल, यावर किरण सोनावणे यांची सविस्तर मुलाखत