Home > मॅक्स ब्लॉग्ज > बिचारे सोमय्या करणार तरी काय? तुषार गायकवाड

बिचारे सोमय्या करणार तरी काय? तुषार गायकवाड

परीस्थिती नसलेल्या अनेक पेशंटसाठी क्राउड फंडींग च्या माध्यमातून पैसे गोळा केले जातात. दुर्दैवाने पैसे जमा करत असताना एखादा पेशंट दगावला तर, जमा झालेले पैसे कोणी परत करतं का? किरीट सोमय्या प्रकरणावर लेखक तुषार गायकवाड यांचे परखड मत...

बिचारे सोमय्या करणार तरी काय? तुषार गायकवाड
X

बस्स! एवढीच छोटीशी गोष्ट आहे. आयएनएस विक्रांत म्हणजे अखेरच्या घटका मोजणारे पेशंटच होते. त्याच्याच उपचारासाठी महाराष्ट्र भाजपचे भावी मुख्यमंत्री किरीट सोमय्या यांनी क्राउड फंडींगच्या माध्यमातून पैसे जमवले होते. पण पेशंट दगावला.

राजभवनाकडे स्वतंत्र खाते नव्हते. केंद्रात पीएम केअर फंड नव्हता. राज्यात सीएम केअर फंड नव्हता. मग बिचारे सोमय्या करणार तरी काय? जमलेल्या पैशातून मुलगा नील सोमय्याच्या दारुवर तरी उडवले नाहीत ना ते पैसे? भाजपच्या अकाउंट मध्ये रीतसर भरलेत. मग विरोधकांना पोटशूळ का?

दाऊदशी व्यवहार न करता भाजपशी केलाय म्हणून किरीटजींना अडकविण्यासाठी आख्खी मविआ कामाला लागलीय. पोलीस कारवाईस सामोरे जायला सोमय्या मराठी माणूस वाटले का? मराठी माणूस कसल्याही कारवाईला निधड्या छातीने समोर जातो.

आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सेशन कोर्टाने जामीन फेटाळला असला तरीही, रात्रीच्या १२ वाजता सुप्रीम कोर्ट उघडून किरीटजींना जामीन मिळेल याची खात्री आहे. जामीन मिळेपर्यंत गुजरात मध्ये लपले म्हणून लगेच पळपुटे बाजीराव ठरले का?

गुलामांनो पैसे पचवायला पण अक्कल आणि धमक लागते. ती धमक फक्त भाजपकडे आहे. मग ते आयएनएस विक्रांतसाठी केलेले क्राउड फंडींग असो किंवा पीएम केअर फंड!!

विरोधकांना साधा सीएम केअर फंड काढता येईना आणि चाल्ले किरीटजींना जेलमध्ये टाकायला. या सूडाच्या कारवाईचा निषेध म्हणून महाराष्ट्र भाजपचा प्रामाणिक, सच्चा कार्यकर्ता मुंडन करुन तीव्र निषेधार्थ रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

Updated : 12 April 2022 1:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top