#MaxKisan 7 मिनिटात एका एकर मध्ये ड्रोन द्वारे फवारणी...
X
शेतीचे उत्पादन वाढवायच असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही असे म्हटले जाते. कीड नियंत्रणासाठी फवारणी यंत्र सर्वात महत्वाचं मानलं जाते. पारंपरिक पद्धतीने शेतकरी पाठीवर फवारणी यंत्र घेऊन शेतात फवारणीपासून ते पॉवर्स प्रे, ट्रॅक्टरद्वारे फवारणी करतात. आता मात्र ड्रोन द्वारे थेट फवारणी करणारे तंत्रज्ञान आल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ड्रोनद्वारे फवारणी कशी करायची याचा डेमो जळगाव जिल्ह्यातील खेडी शिवारातील शेतात करण्यात आला. जळगाव जिल्हा कृषी विभाग तसेच ड्रोन फवारणी निर्माण करणाऱ्या तसेच ट्रेंनिग देणारी सिजेंटा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन द्वारे फवारणीचा यशस्वी डेमो करण्यात आला. यात एका एकरात सात मिनिटात 10 लिटर मध्ये ड्रोन द्वारे फवारणी करण्यात आली. ड्रोन द्वारे फवारणी केल्याने शेतकऱ्यांना विष बाधा होत नाही, मजुरांची अडचण दूर होणार आहे, पर्यावरणाचा नुकसान होणार नाही. यामुळे भविष्यात ड्रोन यंत्राद्वारे फवारणी काळाची गरज असल्याचे मत कृषी तंज्ञानी व्यक्त केलं आहे. मॅक्समहाराष्ट्रने शेताच्या बांध्यावर जाऊन आढावा घेतलाय.