Home > Election 2020 >   बेरोजगार तरूणांचा मोर्चा गोरक्षक समुहाकडे

  बेरोजगार तरूणांचा मोर्चा गोरक्षक समुहाकडे

  बेरोजगार तरूणांचा मोर्चा गोरक्षक समुहाकडे
X

वास्तविक बेरोजगारी हे गोरक्षकांच्या वाढलेल्या टोळ्याचे कारण नाही, तर द्वेषभावना हे मुळ आहे. कत्तलखान्याकडे जाणा-या गायी वाचवण्याचा आणि गोमातेला जीवदान दिल्याचा आवेश यामागे आहे. मात्र, २०१७ नंतर योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तर हे चित्र अधिक भेसूर झाल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.

शैलेश प्रतापसिंह हा २४ वर्षीय युवक गेल्या तीन वर्षांपासून नोकरीच्या शोधात आहे. त्याने एम एस सी आणि बी एड केलंय. पण कुठेही जागा रिक्त नाहीय, प्रचंड स्पर्धा असल्याचं तो सांगतो. मात्र तो इतर बेरोजगारांप्रमाणे निराश किंवा हताश झालेला नाही. जेव्हा तो परिक्षेच्या तयारीत नसतो. तेव्हा तो सामाजिक कामात भाग घेतो. तो राष्ट्रीय चेतना समितीचा भाग असून ही संस्था उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील बुलंद शहरात काम करते.

राष्ट्रीय चेतना समितीच्या सदस्यांसह शैलेश प्रतापसिंह अगदी उजवीकडील हेमंत सिंह हा ३२ वर्षीय तरूण राष्ट्रीय चेतना समितीचा संस्थापक असून तो बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे. इतंकच नाही तर बुलंद शहरातील एका सरकारी प्राथमिक शाळेत तो शिक्षकही आहे. हेमंत सिंह यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, त्यांच्यापैकी बहुतेक जण हे एकतर विद्यार्थी आहेत. नोकरीच्या शोधात असलेले तरूण आहेत. आमचा मुख्य उद्देश हा रक्तदान शिबीर भरवणे हा आहे. तसेच बेवारस प्रेतांचा अंत्यविधी करणे आणि गोमातेचे रक्षण करणे ही कामे आम्ही करतो. त्यासाठी आम्हाला जनसंपर्क ठेवावा लागतो. लोकांकडून मिळणा-या माहितीच्या आधारेच हे करणे शक्य होते.

कत्तलखान्याकडे जबरदस्तीने नेल्या जाणा-या गायींचे रक्षण करणे हे त्यांचं फिल्ड वर्क असल्याचं ते सांगतात. गो सेवा करू लागल्यापासून आपण बेरोजगार असल्याची भावना नष्ट झाल्याचे शैलेश सांगतो. जेव्हा तुम्ही काहीतरी काम करीत असता तेव्हा निराश किंवा निरूपयोगी असल्याचं वाटत नाही,असं गळ्याभोवती गुंडाळलेल्या भगव्या गमच्यानं कपाळावरील घाम पुसत तो सांगत असतो. इतंकच काय घरातील लोकांनाही आपला मुलगा उगाच वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी करीत असल्यासारखं वाटतं. तर समाजातही लोक तुमच्याकडे आदराने पाहतात.

वास्तविक केवळ बेरोजगारी इतकंच गोरक्षणामागील मुख्य कारण नाहीय तर द्वेषभावना हे त्यामागील सत्य आहे.

कारण या गोरक्षक सेवेत काही सदस्य फार काळापासून काम करीत आहेत. गोरक्षणाच्या नावाखाली होणा-या समुह मारहाणीच्या घटनांबाबत विचारताच शैलेश म्हणतो...

गायीला वाचवण्यासाठी काही पावले उचलावी लागली तर त्यात गैर काय? तसं आम्हाला दंगल किवा वाद नको असतात. मात्र, गाय ही आमची माता आहे आणि तीच्या संरक्षणाला आम्ही प्राधान्य देतो.

मात्र गोरक्षणाला समाजमान्यता मिळत असल्यानं गोरक्षणाकडे बेरोजगार तरूणांचा कल वाढतोय. त्यामुळं आपलं महत्त्व वाढत असून आदरभाव मिळत असल्याचं त्यांना वाटतंय. त्यांना या निमित्तानं काम आणि ओळख मिळतेय. त्यामुळं द्वेषभावना हा त्यांच्या कामाचा भाग झालाय.

आम्हाला आर्थिक मदत करणा-या व्यक्ती समाजातील प्रतष्ठित व्यक्ती आहेत. त्यांच्यापैकी काहीजण व्यावसाय़िक आहेत. काहीजण स्वतःचा व्यवसाय चालवतात. काहीजण बॅंकर्स आहेत, तर काहीजण चार्टर्ड अकांउंटंट असल्याचं हेमंत सांगतो. नोकरीसाठी संघर्ष कऱणारे अनेकजण आमच्या संपर्कात असतात. कारण आम्ही नोकरी देवू शकणा-या लोकांच्या संपर्कात आहोत. काहींना तर आमच्या शिफारशींमुळे नोक-याही मिळाल्या आहेत, असं हेमंतचं म्हणणंय.

सुमारे अडिचशे व्हॉटसअपच्या ग्रुपवर आपण अँक्टिव्ह असल्याचं हेमंत सांगतो. कारण यातून आम्हाला स्वयंसेवक मिळतात. जे लोक आता नोकरी धंद्याला लागले आहेत. ते वेळ देवू शकत नाहीत. मात्र, आम्हाला आर्थिक मदत करतात. त्यामुळे एकदा आपल्याला नोकरी लागली तर आपणही गोरक्षणाच्या कामाला फारसा वेळ देवू शकणार नाही. कारण ९ ते ५ यावेळेत मला कामावरून फिल्डवर्कसाठी येता येणार नाही. त्यामुळं ज्याला वेळ असेल अशा कार्यकर्त्याकडे मला काम सोपवावं लागेल.

इंडिया स्पेंड या संकेतस्थळाच्या माहीती आणि आकडेवारीनूसार २०१२ नंतर गोरक्षणाच्या बाबतीत उत्तरप्रदेश अतिशय हिंसक होत चालला आहे. गोरक्षणाच्या नावाखाली झालेल्या १६ हिंसक कारवायांमध्ये ९ जणांना जीव गमवावा लागलाय. योगी आदित्यनाथ यानी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा भार स्विकारल्यानंतर तर या घटना अधिक वाढल्या असून उन्माद वाढल्याचं जाणकारांचं म्हणणंय.

गेल्या डिसेंबर महिन्यात बुलंदशहरात एक अत्यंत भयानक घटना घडली. गोरक्षणाच्या नावाखाली कत्तलखान्याला गायी नेत असल्याचा आरोप करीत एका पोलीसाचा बळी घेतला गेला. गायी वाहून नेणा-या गाड्या सियाना गावाजवळील जंगलात विखुरलेल्या आढळल्य़ा. मात्र, या घटनेत सुबोध कुमार यांना प्राण गमवावा लागला असून याप्रकरणी बजरंग दलाचा कार्यकर्ता योगेश राज याला मुख्य आरोपी म्हणून अटक केलीय.

बजरंग दलाचा जिल्हा समन्वयक म्हणून काम करणा-या हेमंतला शिक्षक म्हणून नोकरी लागली, असं त्याचा कनिष्ठ सहकारी योगेश सांगतो. अशा परिस्थीतीत बजरंग दलाचे कार्य काय आहे? याबाबत आपल्याला जाणिव असल्याचं सांगत जर एखाद्याला कुठे गाय कापताना आढळले तर गावकरी आम्हाला कळवतात. आम्ही पोलीसांना कळवतो. कधी पोलीस आधी पोहोचतात तर कधी आम्ही आधी पोहोचतो. तर कधी आमच्या आधी गर्दी जमलेली असते. अशा वेळी परिस्थीती हाताळणे कठीण होते. गायींची कत्तल करणा-यांवर पोलस कारवाई करतील यावर जमावाचा विश्वास नसतो, मग अशावेळेस ते आमच्याकडून न्यायाची अपेक्षा करतात.

सुबोध कुमार त्यादिवशी परिस्थीती हाताळू शकले नाहीत. वातावरण चिघळले होते, कुणाचा कुणाला काही पायपोस लागत नव्हता. मात्र त्यांच्या हत्याप्रकरणात आमच्या कार्यकर्त्यांचा सहभाग नव्हता. त्यांच्या लोकांवर कुठलंही बालंट येवू नये म्हणून पोलीस बजरंग दलाची नाहक बदनामी करीत आहेत. खरे तर आम्ही संपूर्ण दिवस पोलीस आणि प्रशासनाच्या संपर्कात होतो. जेव्हा पोलीस परिस्थिती हाताळू शकत नाहीत. तेव्हा ते आम्हाला बोलावतात आणि आपल्या कामाला निघून जातात.

पोलीसांबाबत बोलत असताना हेमंतच्या पथकातील एका तरूणाने फौजदार होण्याची इच्छा व्यक्त केली. नितीन गुर्जर असं या तरूणाचं नाव असून तो आपले फुरफरणारे बाहू दाखवित म्हणाला की मी रोज सकाळी धावण्याचा सराव करतो, तर संध्याकाळी व्यायामशाळेत जातो. दिवसभर मात्र फिल्ड वर्क करतो त्यामुळं मला आनंद मिळतो.

नितीन हे सांगत असताना त्याच्या शेजारी बसलेला त्याचा सहकारी म्हणाला की, हा लवकरच फौजदार व्हावा, कारण पोलीसांत सुद्धा कुणीतरी आपला माणूस असला पाहिजे ना.

सदर रिपोर्ट ‘फर्स्टपोस्ट’ या इंग्रजी वेबसाईटला 20 एप्रिल 2019 ला प्रकाशित झाला असून या मूळ रिपोर्टची खाली देण्यात आली आहे.

Travels through the Hindi belt: Hatred, unemployment spur UP youths in search of purpose to join cow vigilante groups

Updated : 15 May 2019 7:08 PM IST
Next Story
Share it
Top