Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोकण नावाच्या स्वर्गाला, मुंबई-गोवा महामार्गाची नरकवाट

कोकण नावाच्या स्वर्गाला, मुंबई-गोवा महामार्गाची नरकवाट

कोकणाला पृथ्वीवरचा स्वर्ग असे संबोधले जाते. पण कोकण नावाच्या स्वर्गात जायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्गाची धोकादायक नरकवाट पार करुनच जावे लागते. वाचा कोकणच्या विकासाचे वास्तव मांडणारा कृष्णा कोलापटे यांचा लेख…

कोकण नावाच्या स्वर्गाला, मुंबई-गोवा महामार्गाची नरकवाट
X

महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणून कोकणची ओळख आहे. निसर्गानं कोकणाला भरभरून दिलंय, मात्र इतकं असूनही कोकणाचा त्याच्या क्षमतेप्रमाणे विकास झालेला नाही, हे वास्तव मान्यच करावं लागेल. परदेशातील पर्यटनासमोर आव्हान उभं करण्याची क्षमता असलेल्या कोकणाला कुणाचा शाप लागलाय हेच कळत नाहीये.





कोकणात सर्वात महत्त्वाचा चर्चिला जाणारा विषय म्हणजे कोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग २०११ साली या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. १२ वर्षांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेलाय तरी कोकणातील या महामार्गाचा प्रश्न अद्याप काही सुटलेला नाही.

ज्या कोकणानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, विनोबा भावे, सचिन तेंडूलकर, पांडुरंग काणे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारखे भारतरत्न दिले, त्याच कोकणाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका असलेला मुंबई-गोवा महामार्ग १२ वर्षांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेला तरी अजून पूर्ण झालेला नाही. या महामार्गानंतर आलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू देखील झाला. समृद्धी महामार्गासाठी राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं तत्परता दाखवली, तशीच तत्परता मुंबई-गोवा महामार्गासाठी का दाखवली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.

कोकणात असा एकही नेता नाही का ? जो संपूर्ण कोकणचा विचार करत असेल. किंवा त्याच्याकडे कोकणच्या पर्यटनापासून उद्योग-धंद्या पर्यंतच्या विकासाचा आराखडा असेल कित्येक लोकं आपली गावं सोडून मुंबईत नोकरीसाठी आली आहेत. का बरं कोकणचा विकास होत नसेल याचा कोणी विचार केला आहे का? मूलभूत गरजांमध्ये रस्ता देखील एक साधन मानलं जातं. ज्या ज्या गावात रस्ता पोहचला त्याचं शहरीकरण झालं आहे. मुंबई कोकणाची हे मान्य पण तळकोकणाचं काय ? की मुंबईच्या व्यतिरिक्त कोकणात दुसरी मोठी बाजारपेठ होऊच द्याची नाहीये.

७२० किलोमीटरचा समुद्र किनारा या कोकणाला लाभलाय. म्हणजे विचार करा याचा जर व्यवस्थित आराखडा तयार करुन निसर्गाची हानी न करता जर विकास केला तर मुंबई सारख्या १०० बाजारपेठा घडवण्याचं सामर्थ्य फक्त कोकणात आहे. डोंगर दरी पासून रेल्वे महामार्ग, समुद्र वाहतूक, असं वाहतूकीचं जाळं तयार करण्याची गरज आहे.





विकासाचा पाया म्हणजे वाहतूक आहे. जेवढी वाहतूक वाढेल तेवढच स्थानिक बाजारपेठ वाढतील. परंतु मुंबई गोवा हे महामार्गाच नाव असलं तरी गोव्याला जाणाऱ्या गाड्या ह्या बऱ्याचशा पुणे कोल्हापूर मार्गी गोव्यात जात आहेत कारण एकचं कोकणातील रस्ते महामार्ग, महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग मुंबईत ते नागपूर काही वर्षातचं पूर्ण झाला, परंतु २०११ पासून प्रतिक्षेत असणार आमचा कोकणातील मुंबई गोवा महामार्ग आजही त्याच खस्ता खातोय दरवर्षी गणपतीला जाणारा चाकरमानी हा विचार करत असतो की यंदा तरी कोकणात सुसाट प्रवास करेल परंतु ते ही कोकणवासियांचं दुर्भाग्य मानाव लागेल.





कालच बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणतील मुंबई- गोवा महामार्गाची पाहाणी केली. परंतु त्यांनी सांगितले की गणपती पर्यंत चौवपदरीकरणाच्या एका लेन ची सुरवात करण्याच लक्ष आहे. त्यामुळे यंदा तरी माझा चाकरमाणी या मुंबई-गोवा महामार्गावरून सुसाट गणपतीला गावी पोहचेल का? हे पाहाव लागणार आहे.

Updated : 15 July 2023 3:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top